शासन या नागरिकांना देत आहे Free e rickshaw! तुम्ही केलाय का अर्ज? 5 मिनिटांत वाचा संपूर्ण माहिती..
Free e rickshaw : शासनातर्फे सर्वच समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येऊन त्यांचे लाभ विविध लाभार्थ्यांना मिळतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनाही शासन विविध योजनांद्वारे निरनिराळे लाभ देते. जसे की, दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार निर्मितीला चालना देण्याकरिता त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा शासन विविध योजना राबवते.
याच अंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या आणि पर्यावरण पूरक असणाऱ्या फिरत्या वाहनावर असलेले दुकान उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र दिव्यांग आणि वित्त विकास महामंडळातर्फे 100 टक्के अनुदान देण्यात येते.
Free e rickshaw कुणाला मिळू शकते? यासाठी कोण अर्ज करू शकतो?
Free e rickshaw मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांचा क्रायटेरिया खालीलप्रमाणे.
- यासाठी लाभार्थी अर्जदार हा ४० टक्के दिव्यांग असला पाहिजे.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 या वया दरम्यान असावे.
- लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारापर्यंत असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाते.
Free e rickshaw वर तुम्हाला कोणकोणते व्यवसाय करता येईल?
👉🏻 मोफत रिक्षा घेण्याचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈🏻
Free e rickshaw द्वारे दिव्यांग व्यक्तींना पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, स्टेशनरी, किराणा, बूट+बॅग्ज दुरुस्ती, रद्दी भंगार वस्तू, फळांचे दुकान, भाजीपाला, प्रसाधने, किरकोळ वस्तू भांडार, मोबाइल दुरुस्तीचे दुकान, फिरते झेराक्स सेंटर, विविध स्वतंत्र व्यवसाय, वाहतूकीचे सर्वच व्यवसाय लाभार्थ्याला करणे शक्य होते.
अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
Free e rickshawसाठी अर्ज करता वेळेस खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- दिव्यांग प्रमाणपत्र,
- आधार कार्ड,
- अधिवास प्रमाणपत्र,
- बँक पासबुक,
- रेशन कार्ड,
- यूडीआयडी कार्ड,
- जातीचा दाखला आदी कागदपत्रे लागतात.
👉🏻 मोफत रिक्षा घेण्याचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈🏻
अर्ज करण्याची अंतिम मुदत?
महाराष्ट्र राज्य दिव्यंग वित्त आणि विकास महामंडळमार्फत 100 % अनुदानावर अपंग व्यक्तींना e rickshaw देण्यात येत असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे.