Free invitation cards making in marathi : लग्न असो वाढदिवस असो किंवा गृहप्रवेश असो, निमंत्रण पत्रिका तयार करा अगदी मोफत; हे ऍप करा डाऊनलोड

Free invitation cards making in marathi: भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे. येथे प्रत्येक धर्मात विविध सोहळे किंवा धार्मिक कार्यक्रम असतात. अगदीच नाही तर लग्नसोहळा किंवा नामकरण विधी तर असतोच असतो. मग अशावेळी पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका तयार करायची असते. बाहेर डिझायनरकडे गेल्यास अशा डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी ते भरपूर पैसे चार्ज करतात. म्हणूनच आम्ही तुमच्या सेयीसाठी काही असे ऍप्स आणि वेबसाईट्स घेऊन आलो आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी मोफत मराठी निमंत्रणपत्रिका बनवू शकता. चला तर मग पाहूया कोणकोणते आहेत हे ऍप आणि वेबसाईट्स.

Free invitation cards making in marathi
Free invitation cards making in marathi

आपण भारतीय लोकांच्या घरात वर्षभर कौटुंबिक किंवा सार्वजनिक विविध कार्यक्रमांचे आयोजन होताच असतात. मग हे कार्यक्रम लग्न असो वाढदिवस असो किंवा डोहाळे जेवण असो गृहप्रवेशचे असतात. या सर्व कार्यक्रमांना पाहुणांना आमंत्रित करण्यासाठी आपण निमंत्रण पत्रिका छापून घेतो, मात्र आता बाहेरून पत्रिका न छापता घरबसल्या खलील कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पत्रिका तुमच्या मोबाईलवर बनवू शकता.

खालील कार्यक्रमांसाठी आपण निमंत्रणपत्रिका बनवून घेत असतो.

  • लग्नपत्रिका
  • साखरपुडा निमंत्रण
  • वास्तुशांती निमंत्रण
  • गृहप्रवेश निमंत्रण
  • डोहाळे जेवण
  • मुलाचे जावळ
  • बाळाचा नामकरण सोहळा
  • ओटीभरणी निमंत्रण
  • सत्यनारायणाची पुजा

सध्या आहे डिजिटल निमंत्रण पत्रिकांचा जमाना

सध्या डिजिटल युगात कागदी आमंत्रण पत्रिका ऐवजी डिजिटल स्वरूपातील निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण डिजिटल पत्रिका पाठवणे सोपे आणि जलद असते, शिवाय डिजिटल निमंत्रण पत्रिका बनवण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी असते. डिजिटल निमंत्रण पत्रिका आपण नातेवाईकांना व्हॉट्सॅपद्वारे, ईमेलद्वारे आणि टेलिग्रामसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठवण्यात येतात. Free invitation cards making in marathi

Free invitation cards making in marathi

तुम्ही तुमच्या घरात होणाऱ्या प्रत्येक समारंभासाठी लागणारी invitation cards तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवर मोफत बनवू शकता. जाणून घ्या अश्याच काही वेबसाईट आणि ऍप्सबद्दल.

कॅन्वा – Canva

https://www.canva.com/ या अधिकृत लिंकवर क्लिक करुन तुम्ही Canva या वेब डिझायनिंग वेबसाईटवर जाऊन तुमच्या घरातील प्रत्येक शुभकार्याच्या निमंत्रण पत्रिका तसेच सोशल ग्राफिक्स देखील सोप्या पद्धतीने बनवू शकता. या वेबसाईटवर काही निमंत्रण पत्रिकांचे आऊटलेट फ्री आहे, तर काहीं आऊटलेटसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. जर का तुम्ही फ्री निमंत्रण पत्रिकेचा फॉरमेट निवडला तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. Free invitation cards making in marathi

मराठी इन्विटेशन कार्ड्स

https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards या लिंकवर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व घरगुती सोहळ्यांसाठी लागणाऱ्या मराठी निमंत्रण पत्रिका अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने एडिट करु शकणार आहात. आणि ते एडिट करुन त्यामध्ये आवश्यक ती भरुन अतिशय छान अशी निमंत्रण पत्रिका बनावता येते. Free invitation cards making in marathi

ग्रिटिंग इस्लॅँड –  Greetings Island

https://www.greetingsisland.com/ या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही Greetings Island या इंग्रजी वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर तुम्हाला रिंग सेरेमनी म्हणजेच साखरपुडा, रिसेप्शन, लग्न अशा अनेक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांचे फॉर्मॅट दिसतील, त्यांचा वापर करुन तुम्ही तुम्हाला हव्या त्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका बनवता येईल. तसेच येथे पैसे देऊन देखील प्रीमियम फॉर्मॅट निवडून सहज सोप्या पद्धतीने सुंदर अशी निमंत्रण पत्रिका बनावता येईल.

पेपरलेस पोस्ट – Paperless Post

https://www.paperlesspost.com/ या लिंकवर केल्यास तुम्ही पेपरलेस पोस्ट या वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही अतिशय सुंदर अश्या निमंत्रण पत्रिका बनवू शकता त्याही पूर्णत: मोफत.

याशिवाय मोफत निमंत्रण पत्रिका बनविण्यासाठी असे अनेक एॅप उपलब्ध आहेत. परंतु आपल्या काहींना याबद्दल माहितीच नसते. परंतु आता तुम्ही तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे खूप पैसे वाचवू शकता आणि त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या मोफत निमंत्रणपत्रिका बनवण्यासाठी मार्गदर्शन करु शकता. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या. Free invitation cards making in marathi

Similar Posts