Government Scheme for Girls: मुलींना मिळणार सरकारकडून 1 लाख रुपये, त्यासाठी करा हे काम
Government Scheme for Girls: देशातील प्रत्येक समाजासाठी सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते. तुमच्या घरात मुलगी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. देशातील मुलींसाठी एक खास योजना राबविली जाते. ज्या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार आहे.
Government Scheme मुलींच्या भविष्याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने पुन्हा खास योजना सुरु केली आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
मुलींना 1 लाख रुपये मिळणार
सरकार योजनेअंतर्गत तुमच्या मुलीच्या नावावर 5 वर्षांसाठी 6-6 हजार रुपये एका फंडात जमा करते. म्हणजेच तुमच्या मुलीच्या नावावर एकूण 30 हजार रुपये जमा झाले. जेव्हा तुमची मुलगी 6वीच्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा सरकार मार्फत मुलीच्या बॅंक खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात.
Sarkari Yojana तुमची मुलगी 9वी वर्गात प्रवेश केल्यानंतर 4000 रुपये दिले जाईल. अकरावीला प्रवेश घेण्यासाठी सरकारकडून 6000 रुपये, तर बारावी प्रवेशासाठी 6000 रुपये मुलीच्या बॅंक खात्यावर पाठविले जातात. मुलींसाठी ही योजना महत्वकांक्षी आहे.
तुमची मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा सरकारकडून योजनेमार्फत शेवटी 1 लाख रुपये दिले जाईल. (Mulinsathi Yojana in Marathi) आता सरकारने पुन्हा मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही रक्कम वाढविण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच 1 लाखांपेक्षा अधिक रकमेची मदत करण्याचा सरकारचा विचार आहे.
अशाप्रकारे करा अर्ज
सर्व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून गावातील अंगणवाडीत सादर करु शकता. तसेच लोकसेवा केंद्र, प्रकल्प कार्यालय किंवा कोणत्याही इंटरनेट कॅफेमधून देखील अर्ज करु शकता. त्यानंतर प्रकल्प कार्यालयात अर्जाची छाननी केली जाईल आणि अर्ज मंजूर किंवा नाकारला जाईल.
अर्ज मंजूर झाल्यावर सरकार तुमच्या मुलीच्या नावे 1 लाख 43 हजार रुपयांचे प्रमाणपत्र देण्यात येईल. यापूर्वी या योजनेअंतर्गत 1 लाख 18 हजार रुपयांचे प्रमाणपत्र दिले जात होते. म्हणजेच 25 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (Ladli Lakshmi Yojana Maharashtra)
योजनेचा लाभ यांना मिळणार
मुलींना 1 लाख 43 हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचं नाव लाडली लक्ष्मी योजना (Ladli Lakshmi Yojana) असं आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्यातील सर्व मुलींसाठी आहे. ही योजना मध्यप्रदेश सरकार चालवित आहे. ही योजना इतर कोणत्याही राज्यासाठी नाही. या योजनेचा लाभ मूळचे मध्य प्रदेशचे व आयकर न भरणारे आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज