Gram Panchayat Fund Details 2022 | ग्रामपंचायत मध्ये कोणती कामे आली व त्यासाठी किती निधी आला, असे पहा ऑनलाईन
Gram Panchayat Fund Details 2022: ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास करणारी पातळी.. ग्रामपंचायतींचे मुख्य कार्य म्हणजे ग्रामविकासात सहकार्य करणे आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाला सामील करणे. ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्याला म्हणजेच एका वर्षात 12 बैठका होतात. (Gram Panchayat Nidhi Yojana)
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला राज्य व केंद्र सरकार दोन्हीकडून निधी मिळतो. संबंधित योजना ही जर राज्य सरकारची असेल तर संपूर्ण निधी राज्य सरकार देते आणि केंद्राच्या बऱ्यापैकी योजनांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकार देते. तर उर्वरित 40 टक्के निधी राज्य सरकारला द्यावा लागतो. (Gram Panchayat Nidhi Website)
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये ग्रामविकास समितीची एक बैठक बोलावली जाते. या बैठकीत गावातील कामांच्या विषयांवर चर्चा केली जाते. तसेच गावाच्या विकासासाठी सध्या किती निधी उपलब्ध आहे? तसेच सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासाठी अंदाजपत्रक तयार केलं जाते. हे अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवावे लागते. पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते. (Gram Panchayat Nidhi 2022)
एका गावासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर अशा सर्व मिळून 1940 योजना आहेत. मग आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं किंवा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं. यानुसार ठरवल्या जाते. (Gram Panchayat online Report)
ग्रामपंचायतद्वारे विविध प्रकारच्या योजना गावात राबविल्या जातात. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही निधी देतात. ग्रामपंचायत मध्ये कोण कोणती कामे आले व त्या कामासाठी किती निधी आला, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता. (Gram Panchayat Work Details in Marathi)
ग्रामपंचायत निधी व कामाची माहिती ऑनलाईन पहा..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘E-Gram Swaraj’ ॲप लॉन्च केले होते. गावांमध्ये जेवढे ही विकास कामे होतील त्यांचा संपूर्ण लेखाजोखा तुम्हाला या ‘E-Gram Swaraj’ ॲपवर पाहायला मिळेल. ग्रामपंचायतीचा लेखाजोखा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घेऊ या.. (Gram Panchayat Vikas Nidhi Check Online)
ग्रामपंचायतीचा लेखाजोखा असा पहा ऑनलाईन | Gram Panchayat Fund Details
- सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जाऊन ‘ई ग्राम स्वराज’ (e Gram Swaraj) ॲप डाऊनलोड करा. (Gram Panchayat Nidhi App)
- ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर राज्य, जिल्हा परिषद, ब्लॉक पंचायत (तालुका), गाव अशी सर्व माहिती निवडून सबमिट बटणावर क्लिक करा. (Gram Panchayat Passbook)
- यानंतर, ग्रामपंचायत संदर्भातील तीन बाबी तुम्हाला दिसतील. ER Details, Approved Activities, Financial Progress.
- ज्या बाबींची तुम्हाला माहिती हवी असेल, त्या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही ‘Financial Progress’ वर क्लिक केल्यास ग्रामपंचायतीसाठी निधी किती आला आणि किती खर्च झाला याची माहिती बघू शकता.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- 1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??
- महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, अर्ज कसा करावा जाणून घ्या