पार्ले-जी बिस्किटाचे पॅकेट आजही ५ रुपयांनाच कसे ? जाणून घ्या…
पार्ले-जी बिस्किटाची चव आजही लोकांच्या ओठावर आहे. भारतात हा केवळ बिस्किटांचा ब्रँड नाही, तर लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा पार्ले-जी बिस्किटांचा उल्लेख येतो तेव्हा आपण आपल्या बालपणात जातो. पार्ले-जी बिस्किटमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले, पण त्याची चव बदलली नाही. आणखी एक गोष्ट जी बऱ्याच काळापासून बदलली नाही ती म्हणजे पार्ले-जी बिस्किटांच्या पॅकेटची किंमत. आता हे पाकीट पाच रुपयांना मिळते, पण मागील बऱ्याच काळ त्याची किंमत फक्त चार रुपये होती. अशा स्थितीत, सतत वाढणारी महागाई आणि दररोज बदलणाऱ्या वस्तूंच्या किमती या काळात पार्ले-जी कंपनीने ५ रुपये दर कसा कायम ठेवला, हा मोठा प्रश्न आहे.
25 वर्षांपर्यंत एकाच किंमत
25 वर्षांपासून पार्ले-जी बिस्किटांच्या छोट्या पॅकेटची किंमत फक्त 4 रुपये राहिली. कंपनीने ही किंमत कशी राखली याचे संपूर्ण गणित स्विगीचे डिझाईन डायरेक्टर सप्तर्षी प्रकाश यांनी सांगितले आहे. प्रकाश यांनी लिंक्डइनवर लिहिले की, ‘हे कसे शक्य आहे? यानंतर त्यांनी त्याचे गणित सांगितले.
मानसशास्त्रीय पद्धतींचा वापर
प्रकाश सांगतात- ‘1994 साली पार्ले-जी बिस्किटांच्या एका छोट्या पॅकेटची किंमत चार रुपये होती. ब-याच वर्षांनी दर एक रुपयाने वाढून पाकिटाची किंमत पाच रुपये झाली. 1994 ते 2021 पर्यंत पार्ले-जीच्या छोट्या पॅकेटची किंमत फक्त चार रुपये राहिली. ते म्हणाले की पार्ले-जी ने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपला ठसा उमटवण्यासाठी एक जबरदस्त मानसिक पद्धत वापरली.
पॅकेटचा आकार होत आहे लहान
मनोवैज्ञानिक पद्धतीचे वर्णन करताना प्रकाश म्हणतात- ‘आता जेव्हा मी लहान पॅकेट म्हणतो तेव्हा तुमच्या मनात काय येते? तुमच्या हातात सहज बसणारे पॅकेट. पॅकेटमध्ये मूठभर बिस्किटे आहेत. पार्ले यांना ही पद्धत चांगलीच समजली. त्यामुळे किमती वाढण्याऐवजी त्यांनी आपल्या छोट्या पॅकेटची कल्पना लोकांच्या मनात कायम ठेवली. मग हळूहळू त्याचा आकार कमी करू लागला. कालांतराने, लहान पॅकेट्सचा आकार लहान झाला, परंतु किंमती वाढल्या नाहीत.
किती कमी झाले वजन
प्रकाशने सांगितले की, पूर्वी पार्ले-जी चे छोटे पॅकेट 100 ग्रॅमचे असायचे. काही वर्षांनी ते 92.5 ग्रॅमपर्यंत कमी करण्यात आले. मग 88 ग्रॅम आणि आज पार्ले-जीचे छोटे पॅकेट जे पाच रुपयांना मिळते, त्याचे वजन 55 ग्रॅम आहे. 1994 पासून त्याचे वजन 45 टक्क्यांनी कमी झाले आहे. ते या तंत्राचे वर्णन ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणून करतात आणि म्हणतात की बटाटा चिप्स, चॉकलेट आणि टूथपेस्ट बनवणाऱ्या कंपन्या अशा प्रकारे काम करतात.