धक्कादायक..! पोटच्या लेकीशी शारिरीक संबंध ठेवून नंतर नरबळी देण्याचाही प्रयत्न; नराधम बापासह 9 जण पोलिसांच्या जाळ्यात..
यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यामधील मदनी गावामध्ये नराधम बापानेच आपल्या 18 वर्षीय मुलीला गुप्त पैशासाठी बळजबरीने 13 वर्षे शारीरिक संबंध ठेवत नरबळी देण्याचा प्रयत्न केला. 25 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सतर्कतेमुळे पिडीत मुलीचा जीव नरबळीच्या घटनेमधून वाचला.
या घटनेनंतर बाभूळगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून, याप्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम बापासह 9 जणांवर गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय पिडिता ही आई, लहान बहीण आणि वडील राजकुमार धकाते यांच्यासोबत मदनी गावात राहते. पीडिता 4 वर्षांची असताना ती यवतमाळ येथे राहणाऱ्या तिच्या मामाकडे शिक्षण घेण्यासाठी गेली, त्यानंतर तिने अकोल्यात शिक्षण घेतले आणि सध्या ती औरंगाबाद येथे बी फार्मच्या प्रथम वर्षात शिकत आहे.
पीडित मुलगी 13 वर्षांची असताना शाळेला सुट्टी लागल्यामुळे ती यवतमाळ येथील मदनी या गावी यायची, तेव्हापासून तिचे वडील तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे, एकदा सुट्टीच्या दिवशी घरी झोपली असताना तिच्या वडिलांनी बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. तेव्हापासून ती जेव्हा-जेव्हा घरी यायची तेव्हा तिचे वडील तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचे, तिने विरोध केल्यास किंवा कोणाला ही गोष्ट सांगितल्यास तिचे वडील पीडितेला आणि तिच्या आई व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत होते.
पीडितेच्या सतर्कतेमुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले
पीडितेने पोलिसांत नोंदवलेल्या जबानीनुसार, वडील राजकुमार धकाते हा नेहमी मांत्रिकाला फोन करून गुप्तधन मिळवण्यासाठी नेहमी पूजा करायचा. २४ एप्रिल रोजी त्याने पिडीत मुलीला जिवंत ठेवून काही उपयोग नाही, असे सांगितले, त्यानंतर २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नराधम बापाने पीडितेला अंघोळ घातली.
यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मदणी गावातील विजय शेषराव बावणे वय ४१, शेतमजूर रमेश कवडूजी गुडेकर वय ५०, असेच ४ पुरुष व २ महिला बाहेरून आले होते, या सर्वांना सोबत घेऊन राजकुमार त्याच्या घराच्या मागच्या खोलीत गेला आणि पीडितेला, तिच्या आई आणि बहिणीला समोरच्या खोलीत थांबवले आणि दरवाजा बंद केला, त्या वेळी राजकुमार आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेले लोक गुप्त धनाबद्दल चर्चा करत होते, यासाठी एकजण बोलला की, गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याची आवश्यकता आहे, जी पिडीत मुलीने ऐकले
यानंतर पीडितेसह तिच्या आई बहिणीच्या हातात लिंबू देऊन, गणपतीसमोर दुर्वा ठेवून, गणपतीला दूध अर्पण केल्यानंतर, दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा केल्यानंतर, तेथे खड्डा खोदला गेला, पीडित मुलगी हा सर्व प्रकार लपून पाहत होती. तिला संशय आल्याने तीने आपल्याजवळील मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये पुरावा म्हणून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्डयाचा फोटो काढून तो आपल्या यवतमाळ येथील एका मित्राला पाठविला. त्यासोबत ‘माझा गुप्तधनासाठी बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव’ असा संदेशही पाठवला. त्यानंतर त्या मित्राने धाडस दाखवत सर्व प्रकार त्याच्या पोलीस सेवेत असणाऱ्या मित्राला सांगितला..
यादरम्यान या सर्व लोकांनी पीडितेला जबरदस्तीने समोरच्या खोलीत नेले, तिथे सर्वांनी तिची पूजा करून तिच्या गळ्यात फुलांचा हार घातला. याच दरम्यान, पोलीस तिथे पोहोचले, त्यानंतर गुप्तधन प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तसेच पीडितेचे प्राण वाचले.
याप्रकरणी पीडितेने बाभूळगाव पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी तिचे वडील राजकुमार जयवंत धकाते, विजय शेषराव बावणे, रमेश कवडूजी गुडेवार सर्व रा. मदनी, वाल्मिक रमेश वानखेडे, विनोद नारायण चुनारकर, रा. दीपक मनोहर श्रीरामे, आकाश शत्रुधन धनकासर, माधुरी विनय ठाकूर यांच्यासह माया प्रकाश हे सर्व राळेगाव येथील रहिवासी असून, या 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी बाभूळगाव पोलीस तपास करत आहेत.
बाभुळगाव आणि यवतमाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने मादणी येथील घटनास्थळी छापेमारी करत अनुचित प्रसंग होण्यापासून टाळला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधम बापासह 8 जणांना अटक केली असून नरबळीसाठी वापरण्यात आलेलं कुदळ, फावडं, टोपली, पुजेचं साहित्य, चाकू, सुरी इत्यादी साहित्य जप्त केलं.