दहावी पास तरुणांना ‘सब इन्स्पेक्टर’ होण्याची संधी; 1,12,400 रुपये पगार..!!

जर तुम्ही शिक्षण 10वी पास आहे आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्याकरिता एक बातमी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP) 10वी पास तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून या भरतीसाठी पात्र तरुणांना 16 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP recruitment-2022) असलेल्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या..

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP) 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये उपनिरीक्षक (Sub-Inspector) GEOUP B या पदांवर भरती करण्यात येणार असून यासाठीची अर्ज दाखल करणे 16 जुलै 2022 पासून सुरु करण्यात येणार आहे. इच्छुक तरुणांनी recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु करावा. या भरतीसाठीची अर्ज करण्याची ant तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

रिक्त जागांचा तपशील

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP) उपनिरीक्षक पदाकरिता (Sub Inspector) 37 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पुरुषांना 32 पदांवर भरती करण्यात येणार असून यामध्ये
खुल्या प्रवर्गातील – 07 पदे,
SC – 02,
ST – 02,
OBC – 15,
EWS – 03 या पद्धतीने रिक्त जागां भरायच्या आहे.

महिलांना 05 पदांवर भरती करण्यात येईल. यामध्ये
खुल्या प्रवर्गातील – 01 पदं,
SC – 02,
OBC – 01 या पद्धतीने रिक्त जागां भरायच्या आहे.

या पद्धतीने होईल निवड प्रक्रिया?
या भरतीकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, पीईटी आणि पीएसटीद्वारे केली जाणार असून लेखी परीक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना पुढीच्या परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.

किती मिळेल वेतन?
उपनिरीक्षक (sub inspector) या पदांसाठी निवड झालेल्या पुरुष आणि महिला उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना वेतन देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीकरिता 10वी पास आणि सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा (civil engineer deploma) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बरोबरच अर्जदारांचे वय 20 वर्षे ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेत शिथिलता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी अधिसूचना डाऊनलोड करू शकतात.

कसा कराल अर्ज

● इच्छुक तरुणांना ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल.

● त्यानंतर वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.

● त्यानंतर ईमेल आयडी नोंदवून नोंदणी करा.

● त्यानंतर ITBP SI Recruitment 2022 या पर्यायाची निवड करा.

● त्यानंतर संपूर्ण तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावी.

● त्यांनतर अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

● अर्ज डाऊनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

ITBP साठी अर्ज फी
● सामान्य/ओबीसी (पुरुष उमेदवार) – रु. 100/-

● SC/ST/महिला उमेदवार/माजी सैनिक – कोणतेही शुल्क नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!