जमीन खरेदी विक्री नियमात बदल. जमीन तुकडा बंदी नियम रद्द. बघा काय आहे नवीन नियम.
आताच्या काळात जगाची होत असणारी वाटचाल बघता निर्माण होणाऱ्या आधुनिकीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जोमाने वाढ होत आहे. कोणतही क्षेत्र यातून सुटलेलं नाही. याच प्रक्रियेत जमिनींना अगणित महत्त्व प्राप्त झाले आहे आणि जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणाऱ्या या भावांमुळे जमिनीच्या खरेदी विक्रीत सुद्धा वाढ होताना दिसून येते. महाराष्ट्रात शेत जमिनीच्या खरेदी विक्री साठी अनेक नवनवीन नियम सुद्धा लागू आहेत. jamin kharedi vikri niyam
नवीन नियमांनुसार शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. ज्यानुसार १, २ गुंठ्यात जमीन विकणे शक्य होणार असून खरेदी विक्रीचे बरेच प्रश्न सुटणार आहे. तर नेमका काय आहे तो नियम? तर, आलेल्या नियमानुसार तुकडा बंदीचे नियम रद्द करण्यात आले आहेत. ज्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरू करण्याचा मार्ग देखील मोकळा करण्यात आला आहे अस दिसून येत. तुकडेबंदीच्या नियमामुळे होणारा त्रास आता संपणार आहे. tukdabandi niyam radda
तुकडा बंदी म्हणजे नेमक काय? तर, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही. आता प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय? तर, तुकडेबंदी – तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ नुसार जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे क्षेत्र ठरविण्यात आले आहे. तुकडा बंदीच्या नियमामुळे कर्ज असल्यास २ गुंठा जमीन विकल्याने ते फेडता येत असेल तरी २० गुंठे जमीन विकल्याशिवाय पर्याय उरत नसे, नियमात बसत नसल्यामुळे खरेदी विक्री केली तरी त्याची दस्त नोंदणी होणे शक्य नव्हते ज्यामुळे जमीन खरेदी करून देखील जमीन नावावर होणार नव्हती असे बरेच प्रश्न शेत मालकासमोर होते. बिगरशेती वापरासाठी जमिनीचे तुकडे पाडण्यास आणि एकत्रीकरण करण्यास प्रतिबंध करणारा कायदा लागू होता. jamin kharedi vikri niyam
परंतु आता नवीन तुकडा बंदी रद्द नियमानुसार आता राज्यांत गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असून त्यांची दस्त नोंदणीही होणार आहे. ज्यामुळे आता खरेदी विक्रीला वाव मिळणार आहे. शेतकऱ्यांना जमिनी या नियमामुळे विकसित करता येत नाही हा प्रश्नही आता सुटणार आहे आणि या व्यवहाराबाबतचे अनेक प्रश्न देखील सुटणार आहे.
शेतकऱ्यांच्या जमीन विकसित होण्यासाठी वाव मिळेल असा आशावादही व्यक्त केला जात आहे. जर तुम्ही जमीन खरेदी विक्री करत असाल किंवा करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे नवीन नियम समजून घेणे आवश्यक आहे.