हृदयद्रावक VIDEO: जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांचा दुर्दैवी मृत्यू..

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जेसीबी च्या टायर मध्ये हवा भरत असताना चाक फुटून यात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

५५ सेकंदांच्या या व्हिडिओ एक व्यक्ती जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना दिसत असून त्याच्यासोबत आणखी एक माणूस आहे, जो त्याला कामात मदत करत आहे. काही क्षणातच, धुराच्या लोटाने टायरचा स्फोट होतो आणि ते दोघे हवेत फेकले जातात. यानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाला. राजपाल सिंग आणि प्रांजन नामदेव अशी मृतांची नावे असून दोघेही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी आहेत.

नेमकं काय घडलं?

सदरील सर्व घटना कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. कारखान्यामध्ये एक जेसीबी उभा दिसत असून यातील एक कर्मचारी जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम करतांना दिसत आहे, तर आजूबाजूला दोन कर्मचारी बोलत असताना दिसतात. तेवढ्यात त्यातील एक कर्मचारी हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्याजवळ येतो आणि टायरवर दाब देऊन हवा किती भरली याचा अंदाज घेतो. मात्र त्याच क्षणी टायरचा स्फोट होतो आणि दोघे कामगार हवेत उडतात.

बेजबाबदारपणा नडला

या दुर्घटनेचा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून काम करत असताना असे बेजबाबदार पणे वागणे नडल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. टायरमध्ये हवा भरत असताना हवा किती भरली आहे यासाठी मशीनचाही वापर केला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!