मोबाईल नंबर टाका अन् जाणून घ्या कोणाचेही लाईव्ह लोकेशन ते सुद्धा फक्त 5 मिनिटांत : location tracker app
location tracker app : नमस्कार, आपण आजच्या या लेखांमध्ये तुम्ही तुमच्या परिवारातील सदस्यांचे, मित्रांचे, नातेवाईकांचे किंवा इतर कोणाचेही मोबाईल नंबरवरून त्यांचे लोकेशन कसे पाहायचे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
location tracker app by mobile number
मोबाईल नंबर वरून लोकेशन पाहण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर असते तेव्हा ती व्यक्ती सुरक्षितपणे घरी येईपर्यंत त्याची काळजी कुटुंबातील व्यक्तींना वाटणे साहजिकच आहे. याबाबतीत मुलींच्या विषयी आई-वडील किंवा मुलगी च्या कुटुंबातील सदस्य हे थोडे जास्त चिंतेत असतात. मुलींच्या बाबतीत ही काळजी वाटणे सहाजिकच आहे. या समस्येपासून समाधान शोधण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने कायमची सुटका यातून करता येऊ शकते.
प्ले स्टोअर वर location tracker app नावाने अनेक ॲप मिळतात परंतु त्यातील बहुतेक ॲप हे पैसे घेऊन ही सेवा पुरवतात त्यामुळे बऱ्याचदा विनाकारण पैसे खर्च होतात. हे ॲप ही सेवा 3000 रुपये पासून ते 1000 रुपये पर्यंत पैसे घेऊन देत असतात. त्यामुळे पैसे मोजून हे ॲप विकत घेणे अनेकांना परवडत नाही. त्याचबरोबर काही ॲप एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधीच अतिरिक्त रक्कमेची मागणी करतात.
अनेकदा तर हे लोकेशन ट्रॅक ॲप त्यांच्या सेवेसाठी मासिक मेंबरशिप घेण्याची सक्ती करतात. त्यामुळे जर एखाद्याला दीर्घ काळापर्यंत किंवा मासिक मेंबरशिप घेण्याची गरज नसेल तर सक्तीने ही मेंबरशिप कडून देण्यात येते आणि विनाकारणच महिन्याचे पैसे भरावे लागतात.
म्हणूनच तुमच्यासाठी अगदी मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करून देणारे ॲप कोणते आहे हे आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक रुपयाही खर्च न करता कोणाचीही लोकेशन पाहू शकता. चला तर मग पाहूया याबद्दलची सविस्तर माहिती.
मोबाईल नंबरवरून location tracker app चे फायदे
ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजण्यासाठी
तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी मोबाईल गुगल मॅप वरून अगदी मोफत पणे त्या व्यक्तीचे लोकेशन मिळवू शकता किंवा पाहू शकता. जर एखादी व्यक्ती त्याच्या लोकेशन बद्दल चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही या गुगल मॅप द्वारे त्याचे खरे लोकेशन शोधून त्याला तुम्ही तो व्यक्ती खोटी माहिती देत आहे असे पकडू शकता. यामुळे एखादी व्यक्ती त्याच्या लोकेशन विषयी तुमची फसवणूक करत असेल तर आता तो तुमची फसवणूक करू शकणार नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर संशय असेल तर त्याच्या मोबाईल मधील गुगल मॅप या ॲपमध्ये तुमचा नंबर ॲड करा जेणेकरून त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील आणि ती व्यक्ती कुठे कुठे जाते हे तुम्हाला समजेल. अशाप्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचे लोकेशन मोबाईल नंबर द्वारे ट्रॅक करू शकता.
मोबाईल चोरीस गेल्यास
मोबाईल चोरीस गेल्यास localion tracker app चा फायदा होऊ शकतो. जर तुमचा मोबाईल चोरीस गेला आहे तर लगेचच घरातील कोणाच्याही मोबाईल मध्ये location tracker app डाऊनलोड करून त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. याद्वारे तुम्हाला समजेल की तुमचा मोबाईल कुठे आहे. असे केल्याने तुम्ही सहजपणे त्या चोरट्यापर्यंत पोहोचू शकाल.
तुमच्या मोबाईल मध्ये Google map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ॲड करून तुमचे लोकेशन त्यांच्यासोबत शेअर करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस केल्यास तुम्ही तो सहजपणे ट्रॅक करू शकाल आणि तुमचा मोबाईल मिळवू शकता.
या ॲपद्वारे पालकांना मुलांच्या वाईट सवयींना ट्रॅक करणे सोपे झाले
सध्या तरुण मुले ही रात्री अप रात्री पब मध्ये किंवा क्लब मध्ये डिस्को पार्ट्या करीत असतात. हे तरुण आपण कोठे जात आहोत ही घरी न सांगता जात असतात. त्यामुळे त्यांच्या पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पालकांना मुलांच्या मोबाईल नंबर वरून location tracker app च्या माध्यमातून मुलांचे लोकेशन समजून घेता येते. काही वेळा हे तरुण मित्रांसोबत लॉन्ग ड्राईव्हसाठी किंवा फिरण्यासाठी दूरपर्यंत जात असतात अशावेळी पालकांना त्यांची काळजी वाटणे साहजिक आहे पण पालकांनी मुलांच्या मोबाईल मध्ये Google map मध्ये त्यांचा नंबर ॲड करून ठेवला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या मुलांचे लोकेशन दिसेल, त्यामुळे तुमची मुले कुठे आहेत ते तुम्हाला कळू शकेल.