शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना लागली लॉटरी, कसे कराल चेक..!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या तर्फे शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे..

शासनाच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरीता शासनाने ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरु केले आहे. कोणत्याही कृषी योजनाचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. मागील काही दिवसांमध्ये महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची नावे लाॅटरी पद्धतीने जारी केली जातात.

MahaDBT Farmer Scheme (‘महाडीबीटी फार्मर स्कीम’) अर्थात ‘एक शेतकरी- एक अर्ज’ या योजनेच्या माध्यमातून कृषी योजनांच्या अनुदानाच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मोठी बातमी आहे. महाडीबीटी या पोर्टलवर कृषी योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची नावे लॉटरी पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.

अनेक शेतकऱ्यांना कृषी योजनेसाठी लाॅटरी लागल्याचे, ते योजनेकरीता पात्र झाल्याचे मेसेज येत आहेत. जर तुम्हाला अर्ज करूनसुद्धा मॅसेज आला नसेल, तर महाडीबीटी पोर्टलवर कसे चेक करता येईल, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

  • महाडीबीटी पोर्टलवर असे करावे चेक..!
  • ‘महा डीबीटी फार्मर स्कीम’च्या पोर्टलवर जाऊन युजर आयडी-पासवर्ड, आधार कार्ड अथवा ओटीपीद्वारे लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यावर ‘तुम्ही विनर झालेले आहात, तुमची कागदपत्रे अपलोड करावीत’ हा पर्याय दिसेल. सोबतच तुम्हाला ‘अर्जाच्या स्थिती’मध्ये तुमच्या अर्जापुढे ‘विनर’ असं दर्शविले जाईल.
  • अनेक शेतकऱ्यांना ‘मॅसेज’ आलेले असले, तरी सुध्दा महाडीबीटी पोर्टलवर अपडेट होण्यास 48 तासांचा अवधी लागू शकतो, त्यामुळेच तुम्हाला लॉगिन करून चेक करावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे

कृषी योजनेमध्ये लाॅटरीत नाव आल्यास, उद्या दिनांक 4 जुलै सोमवारपासून कागदपत्र अपलोड करण्याचा ‘ऑप्शन’ दाखवला जाईल. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, सात-बारा बरोबरच जी वस्तू खरेदी करायची आहे त्याचे कोटेशन अपलोड करावे लागेल. शिवाय बँकेचे पासबुक सुद्धा आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे दिलेल्या मुदतीमध्ये भरणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला तसा मेसेज आला असेल, तर लॉगिन करून पाहा. लॉगिन केल्यावर जर पर्याय दिसत नसेल, तर उद्या म्हणजेच सोमवारपर्यंत वाट पाहा.a

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!