पुन्हा हादरलं औरंगाबाद! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा..

औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस हत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय पतीला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेऊन धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या करून घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही . कैलास बीआनसिंग मिंगवाल असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे.

कैलास हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वीच तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेमधील करोडी शिवारातील गट क्रमांक-१११ मध्ये शेतात कामाला लागला होता. शेतातच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह राहत होता.

दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या कैलासला फरपटतच बाहेर नेले. व कैलासच्या गळ्यावर धारदार शस्त्राने तीन ते चार वार करून पसार झाला. कैलासवर हल्ला झाल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केली.

मयत कैलास मिंगवाल

तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कैलासच्या घराकडे धाव घेतली मात्र, तोपर्यंत अंधाराचा फायदा घेत मारेकरी पसार झाला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमी कैलासला रुग्णालयात हलविले मात्र तो प्रयन्त कैलासची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारेकरी एकच: कैलास हा मध्यप्रदेशतील रहिवासी होता. एका अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली असून मारेकरी कोण आहे? त्याचा मारण्याचा उद्देश काय? त्याच्यासोबत कोणाचे काही जुने वैर होते का? याचा तपास सुरू आहे आहे.- पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांची माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!