माझ्या औरंगाबाद जिल्ह्याला पाच मंत्री आता बघायला मिळणार ‘अच्छे दिन’; खा. जलील यांचा टोला

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज ९ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाला असून आज राजभवनावर १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये औरंगाबादचे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा सुद्धा समावेश आहे.

या मंत्रिमंडळावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्या जिल्ह्याला आता ‘अच्छे दिन’ बघायला मिळेल अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले आहेत. यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी ट्विट केले असून “आता औरंगाबाद जिल्ह्याला पाच मंत्री असून त्यामध्ये २ केंद्रीय मंत्री (डॉ.भागवत कराड आणि रावसाहेब दानवे )आणि ३ राज्य कॅबिनेट मंत्री (अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे)आपल्या सर्वांकडून माझ्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल अशी आशा करूया.

तसेच माझ्या जिल्ह्याला आता ‘अच्छे दिन’ पाहायला मिळेल ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. हा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा सुवर्णकाळ आहे. “तसेच औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा, असे देखील जलील म्हणाले आहेत.

Similar Posts