कुंभारवाडा बनले तुळशीबाग तर रंगारगल्ली हिंगलाजनगर! औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली..
राज्य शासनाने जातिवाचक नावे असलेले गावे, शहरे व वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनपा ने शहरातील ५४ वसाहतींचे नावे बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रशासनाने वॉर्ड कार्यालयांकडून जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. या यादीनुसार नावे बदलण्यात आले आहेत. अशा वसाहतींचे नावे बदलून काय ठेवावे? यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या नावावरही आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ५४ नावां-पैकी ४६ वसाहतींची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
जातिवाचक वसाहतींची जुनी आणि बदललेली नावे
प्रभाग क्र.-१२:
▪️कुंभार गल्ली-गोरोबा काका गल्ली,
▪️ब्राह्मण गल्ली- जगदंब गल्ली,
▪️मल्लावपुरा- सावता गल्ली,
प्रभाग क्र. १३:
▪️भिल्ल गल्ली भीमनगर-एकलव्यनगर,
प्रभाग क्र. १६-
▪️मांगवाडा- मुक्ताईनगर,
▪️चांभारवाडा- संत रोहिदास गल्ली,
▪️भंगीवाडा- वाल्मिकीनगर,
प्रभाग क्र. १८–
▪️बौद्धवाडा- सारनाथ गल्ली,
प्रभाग क्र.२२-
▪️मोमीनपुरा-सुलतानपुरा,
प्रभाग क्र.२३-
▪️धोबीघाट- संत गाडगेबाबा धोबीघाट,
प्रभाग क्र. ४६-
▪️तेलंगवाडा-बिरसा मुंडा मोहल्ला,
▪️गवळीपुरा-विकासपूर,
प्रभाग क्र. ४८-
▪️कुंभारवाडा-तुळशीबाग,
▪️जोहरीवाडा-पारसनगर,
▪️रंगार गल्ली- हिंगलाजनगर,
प्रभाग क्र. ४९
▪️माळीवाडा- सावतानगर,
प्रभाग क्र. ५१-
▪️भोईवाडा- गंगापुत्र कॉलनी,
▪️पारधीपुरा-जीवकनगर,
प्रभाग क्र. ५३–
▪️बौद्धवाडा (पैठणगेट)-किरणनगर,
प्रभाग क्र.६७-
▪️कैकाडीवाडा-शाश्वतनगर,
प्रभाग क्र.६८–
▪️भोईवाडा-उदय कॉलनी,
प्रभाग क्र.७
▪️गोंधळीवाडा-जगदंबा नगर,
प्रभाग क्र.१-
▪️धनगर गल्ली-होळकरनगर,
▪️कैकाडी गल्ली- जाधववाडा,
▪️चांभारगल्ली- एकतानगर,
प्रभाग क्र.२–
▪️ब्राह्मणगल्ली-उन्नतीनगर,
▪️मांगवाडा- लहुजीनगर,
▪️सोनारगल्ली-प्रेरणानगर,
प्रभाग क्र. ८९–
▪️धनगरवाडा-अहिल्याबाई होळकरनगर,
▪️साठेनगर- अण्णा भाऊ साठे नगर,
▪️बौद्धवाडा- गौतम बौद्धनगर,
▪️सुतारवाडा-अयोध्यानगर,
▪️माळी गल्ली- महात्मा फुलेनगर,
▪️कुंभारवाडा – संत गोरोबानगर,
▪️तेली गल्ली- अमृतनगर,
▪️ब्राह्मणगल्ली-परशुराम नगर,
▪️चांभारवाडा- संत रोहिदास नगर,
प्रभाग क्र. ८८-
▪️कुरेशी मोहल्ला- सय्यद सादात मोहल्ला,
प्रभाग क्र. ११३-
▪️वैदुवाडा- जयदुर्गानगर,
प्रभाग क्र. ७०–
▪️मोची मोहल्ला- बाबा रामदेवनगर
याप्रमाणे वसाहतींची नावे बदलण्यात आली आहेत.