मोठी बातमी! यंदा शाळांना उन्हाळ्याची सुटी नाही; एप्रिलमध्येही पूर्ण वेळ शाळा आणि परीक्षा..

भारतात कोरोना महामारीचा प्रदुर्भाव मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले होते.

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्फत शिक्षण देण्यात येत होतं. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे रुळावर उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले जीव..संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद.व्हिडीओ पाहण्यासाठी व सविस्तर बातमीसाठी क्लिक करा..

त्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती सह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिलच्या अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता 1ली ते 9वी आणि इयत्ता 11वीचे वर्ग असणाऱ्या शाळा संपूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

थोडक्यात म्हणजे नेहमी मार्चमध्ये परीक्षा संपायच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवडयात उन्हळ्याच्या सुरू होत होत्या. मात्र यावर्षी पूर्ण मार्च आणि एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा सुरू असणार आहे. एवढेच नाही तर रविवारच्या दिवशी सुद्धा ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी शाळांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही असे दिसतंय.

शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 1ली ते इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यामधील तीसऱ्या आठवड्यात घ्याव्या आणि निकाल मे महिन्यात जारी करावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात परीक्षा द्यावी लागणार असून संपूर्ण एप्रिल शाळा अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे. एकंदरीतच काय तर यावर्षी सुटीचा महिना हा अभ्यासात जाणार असल्याची चिन्हं आहेत.

Similar Posts