कीर्तनकार बुवाच्या “त्या” लीलेचा व्हिडिओ असा झाला सोशल मीडियावर व्हायरल..

औरंगाबाद जिल्ह्यामधील एका किर्तनकाराचा ‘तो व्हिडिओ’ व्हायरल झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार बाबा रासलीला करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण हा व्हिडिओ दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत होता. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे.

सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच यापूर्वी केलेल्या किर्तनाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा म्हणजे ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. पण बाबाकडून चुकून कीर्तनाच्या व्हिडिओ बरोबर रासलीलेचाही व्हिडिओ फॉरवर्ड झाला अन् बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला.

दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कीर्तनकार महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सध्या तिच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लासूरगाव परिसरामधील कीर्तनकार असलेल्या महिला व पुरूष बाबाचे सूर जुळले होते. त्यांच्या का व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर अचानक व्हायरल झाल्याने धार्मिक क्षेत्रात एकच खळबळ माजली. पाहता पाहता हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला. या प्रकरणात तृप्ती देसाईने दखल घेतल्याने आता या प्रकरणाची रंगत वाढली आहे. तृप्ती देसाई यांनी संबंधित बाबाचे नाव उघड करून त्याचा भांडाफोड करणार असल्याचे विधान केले आहे.

Similar Posts