रेल्वे रुळावर उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले जीव, पाहा व्हिडिओ..
महाराष्ट्रातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी एका तरुणाने भरधाव एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित रेल्वे पोलिस ऋषिकेश चंद्रकांत माने यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणाला वाचवले. कुमार गुरुनाथ पुजारी वय 18 वर्षे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रेमनगर टेकडी, उल्हासनगर येथील रहिवासी आहे.
कुमार पुजारी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आला आणि त्याने अचानक रेल्वे रुळावर रेल्वेसमोर उडी मारली. ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिस ऋषिकेश चंद्रकांत माने यांनी तत्काळ रेल्वे रुळावर उडी मारून तरुणाला रुळावरून बाजूला ढकलून त्याचा जीव वाचवला. कौटुंबिक वादातून कुमार पुजारी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
धनंजय मुंडे यांनी त्यांची सहा मुलं आणि अनेक बायका सुद्धा लपवल्या; करुणा शर्माचे खळबळजनक आरोप..
सीसीटिव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे की पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी रुळ ओलांडण्यासाठी उडी मारतो पण रुळावर उडी मारताच तो खाली पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो शांतपणे ट्रॅकवर उभा राहतो. तेवढ्यात एक पोलीस ऋषिकेश चंद्रकांत माने रुळावर पोहोचतात आणि कुमार गुरुनाथ पुजारी याला रुळावरून बाजूला घेतात. पोलिस कर्मचारी ऋषिकेश यांनी कुमारला रुळावरून हटवल्यानंतर काही सेकंदांनी एक्स्प्रेस ट्रेन तिथून पुढे जाते.