पैठण-पाचोड महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, तर 4 गंभीर

पैठणकडे जात असतांना ट्रॅक्टर ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागे येत असलेल्या कार चालकाला सुद्धा ब्रेक लावावा लागल्यामुळे त्या कारच्या पाठीमागून भरधाव येत असलेली कार टॅक्टरच्या मागे असलेल्या कारवर धडकली. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. सदरील घटना ही पाचोड-पैठण रस्त्यावरील लिंबगाव (ता.पैठण) फाट्याजवळ काल दिनांक 23 मार्च बुधवार रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली.

अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे (दोघे रा. दावरवाडी, ता.पैठण जि. औरंगाबाद) असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी, पैठण येथे रहिवासी असलेले राहूल माळवदे व त्यांचा मुलगा साई माळवदे हे कार क्र. (MH 20 CS 4720) पाचोडकडून पैठणकडे जात होते. त्यांच्या पुढे चालत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ट्रॅक्टरला ब्रेक लावल्याने माळवदे यांनी आपली कार ब्रेक केली. मात्र त्यांच्या कारमागे भरधाव वेगात येणारी कार क्र. (MH 20 BY. 9193) च्या चालकाला अचानक वेगावर नियंत्रण करणे अशक्य झाले व काही कळायच्या आत समोरील कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की कार मध्ये समोर बसलेले अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे हे दोघे जण जागीच ठार झाले, तर सोमिनाथ दहीभाते, लतीब तांबोळी यांच्यासह दोघे जणं गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भयंकर होता की दोन्ही वाहनांच्या पुर्णतः चुराडा झाला झाला. पैठणकडे जात असलेल्या पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक फेरोझ बरडे व त्यांचे सहकारी यांना अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पाचोड पोलिसोना माहिती दिली.

सदरील अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर घुगे यांनी उपरोक्त दोघास तपासून मृत घोषित केले, तर चौघांवर प्रथोमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकिय रूग्णालयात (घाटी) पाठविले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!