दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना लागणार लगाम, आरबीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..

कर्ज वसुली करण्याकरीता कर्जदारांना दादागिरी आणि शिवीगाळ करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना लवकरच चाप बसणार त्यांचे ही वागणूक अस्वीकारार्ह आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँकेने यापुढे असले प्रकरण गांभिर्याने घेतले जाणार असून, आगामी काळात या प्रकरणात कठोर कारवाईची पावले उचलली जाणार आहेत. सर्वसाधारणपणे आपातकालीन स्थितीत किंवा अचानक काही आवश्यक निकड असेल तेव्हाच सर्वसामान्य नागरिक कर्ज घेतात. बऱ्याचदा असेही होते की, कर्जदारांची कर्ज फेडण्याची इच्छा असते, आणि सुरुवातीचे काही हप्ते ते भरतातसुद्धा, मात्र त्यानंतर आर्थिक परीस्थितीमुळे आणि उत्पन्नात पडलेल्या खंडामुळे त्यांना पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्यामुळे असे कर्जदार हे डिफॉल्टरच्या यादीत जातात. त्यानंतर लोन देणाऱ्या बँका लोन रिकव्हरी एजंट्सच्या माध्यमातून या कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात करतात.

कर्जदारांचा लोन रिकव्हरी एजंटसकडून होतो छळ

लोन रिक्वहरी एजंटसचे काम हे कर्ज वसूल करणे असते. त्याकरीता लोन रिक्वहरी एजंटसचे हे साम, दाम, दंड, भेद अश्या प्रकाराचा उपयोग करून वेळी-अवेळी फोन करुन, ते कर्जदारांवर दादागिरी करून शिवीगाळही करतात. मात्र अशा धमक्या देणे, हे खरेतर बेकायदेशीर असून सध्याच्या अगदी रजरोजपणे सुरु असलेले आहे. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने या लोन रिकव्हरी एजेंटसच्या या हरकतींची दखल घेतलेली असून, आता यावर कठोर उपाय योजना करण्यात येणार आहेत.

लोन रिकव्हरी एजंट्सची ही वागणूक अस्वीकारार्ह

हे लोन रिकव्हरी एजंट्स चुकीचे वागत आहेत, त्यांची वागणूक स्वीकारण्यासारखी तर मुळीच नाही, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. लोन रिक्वहरी एजंट्सने वेळी-अवेळी कर्जदारांना केलेले फोन, तसेच त्यांच्यावर करत असलेली दादागिरी अयोग्य असल्याचे शक्तीकांता दास म्हणाले आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक गंभीर असून, याबाबत कठोर पावले उचलण्यास जराही कचराई करणार नाही, असेही दास यांनी स्पष्टच केले आहे.

ज्या अनियंत्रित फायनान्स कंपन्या आहेत, त्यांच्याकडून हे प्रकार सर्रास होत असून, याबाबतच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या असल्याचे शक्तिकांता दास यांनी सांगितले. याबाबत तक्रारी आल्यावर कायदेशीर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना याची माहिती देण्यात येणार आहे. तसेच सर्व बँकांनाही यबाबतच्या सूचना देण्यात आले असल्याचेही दास यांनी सांगितले आहे.

लोन रिकव्हरीबाबत आरबीआय (RBI) च्या काय आहेत गाईडलाईन्स? जाणून घ्या..

▪️कर्ज वसुलीसाठी लोन रिकव्हरी एजेंट्स धमकी अथवा दादागिरी करु शकत नाहीत, शिवाय शारिरिक दुखापत वा तोंडी शिवीगाळही करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाहीत.

▪️कर्जदारांना सकाळी 9 पूर्वी आणि संध्याकाळी 6 नंतर फोन करणे हे सुद्धा कर्जदारांना त्रास देण्यामध्ये मोडते, त्यामुळे असे फोन करणे हासुध्दा गुन्हाच आहे.

▪️ कर्जवसुलीकरीता गुंडगिरीचा वापर करणे किंवा त्याची धमकी देणे, हे सुद्धा छळातच मोडते.

▪️कर्जदार काम करत असलेल्या ठिकाणी सूचना न देता जाणे, कर्जदाराच्या नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांना धमकीचे फोन करणे, त्रास देणे हा सुद्धा छळच मानला जातो. धमकीमध्ये अभद्र भाषेचा वापर करने हा सुद्धा छळाचाच भाग मानला जातो.

कर्जदाराच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँक करु शकते ही कारवाई

▪️जर कर्जदारांना रिकव्हरी एजेंट्स त्रास देत असतील तर त्यांनी सुरुवातीला पहिली तक्रार बँकेत करायला हवी. बँकेने या तक्रारीची दखल 30 दिवसांत घेतली नाही तर याची तक्रार वरिष्ठ पातळीवर आणि रिझर्व्ह बँकेकडेसुद्धा करता येते.

▪️रिझर्व्ह बँक या प्रकरणात बँकांना निर्देश देऊ शकते, तसेच गरज पडल्यास बँकांना दंडसुद्धा करु शकते.

▪️थेट रिझर्व्ह बँकेकडे रिकव्हरी एजंटच्या गुंडगिरीची तक्रार केल्यास रिझर्व्ह बँक यावर कारवाईचे निर्देश देऊ शकते.

▪️शिवाय कर्जदारांकडे कोर्टात जाण्याचाही पर्याय आहे.
▪️जर रिकव्हरीने बेकायदेशीर कारवाई केली, मारहाण केली, घरातील एखादी वस्तू जप्त केली तर कर्जदार पोलिसांत सुद्धा तक्रार करु शकतो.
▪️जर रिकव्हरी एजंट जास्तच त्रास देत असेल, चुकीची कृती करत असेल, चुकीचे पत्र पाठवत असेल तर त्या पुराव्याच्या आधारावर वकिलामार्फत कोर्टात जाता येणे शक्य असून लोक अदालत किंवा ग्राहक कोर्टात जाण्याचा पर्याय या कर्जदारांसमोर असतो.

Similar Posts