अजिंठा येथे धावत्या बसने घेतला पेट, 28 प्रवाशी बालंबाल बचावले.

औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवरील भारत दर्शन येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पुण्यावरून मलकापूरला जात असलेल्या एका खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व 28 प्रवासी सुखरूप आहेत.

सविस्तर माहिती अशी की गुरुवारी पहाटे 5 वजेच्या सुमारास 28 प्रवाशांनी भरलेली (MH 12 E Q 9007) साई ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पुण्यावरून मलकापूरकडे जात असतांना, औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील अजिंठा जवळ या धावत्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला. परंतु, चालक संतीष गई यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.

बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. बसमध्ये आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल बामणे, कोल्हे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!