लेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, नागरिकांना अश्रू अनावर; प्रशासनाची कारवाई

औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून आज सकाळी ६ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. मागील ३० वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते.

या तोडक कारवाईमुळे लेबर कॉलनी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. लेबर कॉलनीतील ७० टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या.

लेबर कॉलनी सोडताना अनेक जणांना अश्रू अनावर झाले. तीन पिढ्यांची नाळ शासन आणि प्रशासनाने तोडल्याची टीका सदनिकाधारकांनी केली. त्यांचा संसार अक्षरश: रस्त्यावर आला आहे, अनेकांनी आमच्याकडे राहण्यासाठी आता घरे नाहीत. आता आम्ही कुठे जाणार, असे सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले.

आज सकाळी ६ वाजल्यापासून प्रशासन कारवाईसाठी पोलीस, महापालिका, बांधकाम विभागांच्या पथक जेसीबीसह याठिकाणी कारवाई करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!