नाशिक जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू.. अपघाताचे भीषण फोटो समोर

कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ ट्रॅक्टर एका कारवर उलटून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला असून चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून, एकूण सात जण मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काही जण जखमी सुद्धा झाले आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यामधील वणीच्या डोंगराजवळील मार्कंडेय डोंगराजवळ मुळाणे बारी येथे ही घटना आहे. या अपघातामध्ये ट्रॅक्टर कारवर पलटला. त्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत. जे पाहून कुणाचेही काळीज कपेल. हा अपघात इतका भीषण होता, ट्रॅक्टर कारवर कलंडल्याने, कार पूर्णपणे ट्रॅक्टरखाली अडकल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

अपघाताचे भीषण फोटो

दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा

या अपघाताचे फोटो पाहिल्यास या वाहनांची अवस्था पाहून या अपघाताची दाहकता लक्षामध्ये येते. या अपघातामध्ये या दोन्ही वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पांढऱ्या रंगाची ही पूर्ण ट्रॉलीच्या खाली दबली आहे. या गाडीचा नंबर MH 41 AZ 1005 असा या कारचा नंबर आहे.

मागील काही दिवसांपासून अपघातात वाढ

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अपघातांच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे अनेक जण प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!