PM किसान योजनेचे पैसे घरपोहच मिळणार, त्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत जाण्याची गरज नाही..!
Finance : पीएम किसान योजनेचा 11व्या हप्त्यापोटी 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले आहे. शिमला येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये वर्ग केले..
नाशिक जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू..! पाहा या भीषण अपघाताचे फोटो
पीएम किसान योजनेचे हे पैसे ‘DBT’द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातात. आता शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये काढण्यासाठी बॅंकेमध्ये जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना हे पैसे अगदी घरबसल्या सुद्धा काढता येणार आहेत.
शेतकऱ्यांच्या वर्ग झालेले हे दोन हजार रुपये ‘स्पाइस मनी’ या मोबाईल ॲपच्या (Spice money finance) साहाय्याने घरबसल्यासुध्दा काढता येणार आहे. ‘स्पाइस मनी’ ही एक ग्रामीण ‘फिटनेक’ कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरपोच ‘AEPS’द्वारे (एईपीएस) सरकारी अनुदानाची रक्कम काढून दिली जाते.
असे काढता येणार पैसे..!
पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना घरपोहच देण्याकरीता भारतातील 18 हजार 500 पिनकोडवर स्पाइस मनी कंपनीचे तब्बल 10 लाख अधिकारी काम करीत होते. त्यामुळे PM किसान योजनेच्या तब्बल 10 कोटी लाभार्थ्यांना रक्कम घरबसल्या काढून देता येणार आहे. त्यामुळे हे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेमध्ये जाण्याची गरज नाही.
कसे करणार हे ॲप काम.
‘स्पाइस मनी’चे कर्मचारी ‘QR’ कोडच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामधील पैसे वर्ग करुन घेऊन रोख रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पैसे सरळ हातात मिळणार आहेत.
‘एईपीएस’च्या (AEPS) साहाय्याने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे काढण्यास मदत करण्यासाठी ‘स्पाईस मनी’चे (Spice money finance) अधिकारी गावांमध्ये उपस्थित असतील. ही पद्धत अत्यंत सुरक्षित असून, शेतकऱ्यांकरीता लाभदायक आहे. ग्रामीण भागात बॅंकिंग सेवा पुरवण्याकरीता ‘स्पाइस मनी’ नेहमीच प्रयत्नशील असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक संजीव कुमार यांनी सांगितले.
आठ वर्षाच्या चिमुरड्यानं आधी बाहुलीला दिली फाशी आणि नंतर स्वतः गळफास घेतला.