Pan Card Correction Process 2024 : पॅन कार्ड वरील चुकीचे नाव आणि जन्मतारीख घर बसल्या करा दुरुस्त, फॉलो करा सोप्पी स्टेप्स

Pan Card Correction Process 2024 : पॅनकार्ड आणि आधार कार्ड ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. या दोन्हींचा उपयोग अनेक सरकारी आणि निमसरकारी कामांसाठी केला जातो. अनेक लोकांची आधार कार्ड आणि पॅन कार्डची नावे चुकीची आहेत, एकतर आधार कार्डमध्ये आडनाव आहे पण पॅन कार्डमध्ये आडनाव नाही. आज आम्ही तुम्हाला पॅन कार्डमध्ये तुमचे नाव ऑनलाइन कसे दुरुस्त करू शकता ते सांगणार आहोत.

Pan Card Correction 2024
Pan Card Correction 2024

सरकारी असो अथवा गैर-सरकारी, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेन्ट आवश्यक असतात. कारण कि ही दोन्ही कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून काम करतात. या दोन्ही कागदपत्रांत असलेल्या माहितीमध्ये काही तफावत असल्यास सगळीच कामे रखडतात.

आधार कार्ड असलेल्यांना मिळणार 40 हजार रुपये

बऱ्याच लोकांच्या पॅन कार्डमध्ये असलेले नाव किंवा जन्मतारीख हे आधार कार्डमध्ये असलेल्या महितीपेक्षा वेगळे असते. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांलागते. जर तुमचा सामना करावा लागतो. कार्डमध्ये छापलेले नाव आणि जन्म तारीख आधार कार्डपेक्षा वेगळे असेल तर आता तुम्हाला घाबरण्याची काही एक गरज नाही. तुम्ही घरीबसल्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रकारे ते दुरुस्त करू शकता. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत की तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन दुरुस्ती कशी करू शकता.

ऑनलाइन दुरुस्ती कशी करावी : Pan Card Correction Process 2024 online

  • पॅन कार्डमधील कोणत्याही दुरुस्तीसाठी तुम्हाला या संदर्भित अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला सर्वात वर असलेल्या Application Type या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Changes or Correction या पर्यायांची निवड करावी लागेल.
  • आता इथे तुम्हाला Category हा पर्यायावर जावे लागेल. कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक या पर्यायची निवड करावी लागेल. यासोबतच तुम्हाला येथे वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल.
  • यानंतर पॅन कार्ड दुरुस्ती हा पर्याय निवडावा.
  • आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती आणि त्या बरोबरच त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.  
  • आता फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला 106 रुपये फी म्हणून भरावे लागतील जे दुरुस्ती शुल्क आहे. 106 रुपये भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल.  
  • या पावतीवर असलेल्या क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे नवीन पॅन कार्ड तुम्हाला केव्हा पर्यन्त मिळेल जाईल याची माहिती घेऊ शकता.
  • तुम्ही तुमचे पॅन कार्ड NSDL e-Gov या सरकारी पोर्टलद्वारे सुद्धा दुरुस्त करू शकता.

आधार कार्ड असलेल्यांना मिळणार 40 हजार रुपये

ऑफलाइन सुधारणा करण्याची प्रक्रिया : Pan Card Correction Process 2024 offline

  • तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑफलाइन पद्धतीने सुद्धा दुरुस्त करू शकता.  
  • यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पॅन सुविधा केंद्रात भेट द्यावी लागेल.  
  • येथे तुम्हाला पॅन कार्डमधील दुरुस्तीसाठी फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागतील.  
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर अपडेट झालेले पॅन कार्ड 15 दिवसात तुमच्या घरी येईल.

Similar Posts