महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकार देतंय महिलांना ६ हजारांची मदत..!

Government scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना आणली असून महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने महिलांचा विचार करुन ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना’ आणली आहे. या योजने अंतर्गत महिलांना ६ हजार रुपयाची आर्थिक मिळणार आहे.

नेमकी काय आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जाणून घ्या…

केंद्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना” आणली आहे. तसे पाहिल्यास पंतप्रधान मातृत्व वंदना या योजनेची सुरूवात १ जानेवारी २०१७ मध्येच झाली होती. या योजनेतंर्गत पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत होती.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा उद्देश

कोणतीही सरकारी योजना सुरू करण्यामागे एक उद्देश असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्याचप्रमाणे ही योजना सुरू करण्यामागील उद्देश पुढीलप्रमाणे आहे.

▪️ गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात आणि स्तनपान करवण्याच्या काळात स्त्रियांची काळजी घेण्यासाठी.
▪️ सुरुवातीच्या महिन्यांत महिलांना स्तनपान आणि पोषण याबद्दल माहिती देणे, तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना उत्तम आरोग्य आणि पोषणासाठी रोख प्रोत्साहन देणे.
▪️ कुपोषण रोखण्यासाठी आणि गरोदर महिला आणि स्तनदा महिला आणि त्यांच्या मुलांमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी.

आवश्यक कागदपत्रे: PMMVY योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे

▪️पालकांचे आधार कार्ड
▪️पालकांचे ओळखपत्र
▪️मुलाचे जन्म प्रमाणपत्र
▪️बँक खाते पास बुक

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

आई आणि मुलांची चांगल्या प्रकारे संगोपन करणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलं जातंय. केंद्र सरकारकडून या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

कोणाला मिळतात पैसे?

‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ ही योजना गर्भवती महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करू शकतात.

चार टप्यात मिळणार पैसे

महिलांना हे पैसे तीन टप्प्यांमध्ये मिळणार असून पहिल्या टप्प्यामध्ये १ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यमध्ये २ हजार रुपये देण्यात येतील, तसेच बाळाचा जन्म झाल्यावर शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील 1 हजार रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येतील.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी ऑनलाईन कसा करावा अर्ज

▪️मातृत्व वंदना योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन नोंदणीसाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
▪️ सर्वप्रथम इच्छुक अर्जदाराला PMMVY योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्जदाराच्या समोर होम पेज उघडेल. होमपेजवर तुम्हाला लॉगिन फॉर्म दिसेल.
▪️आता तुम्हाला या लॉगिन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल जसे की ईमेल आयडी, पासवर्ड कॅप्चा कोड इ. सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
▪️लॉग इन केल्यानंतर, तुम्ही “प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना” साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
▪️आता तुम्हाला ऑनलाइन अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर, दिलेली माहिती एकदा तपासा आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!