PM Svanidhi Yojana | मोदी सरकारकडून या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत विना व्याजदर कर्ज मिळणार, असा करा अर्ज

PM Svanidhi Yojana
PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana: मोदी सरकार सध्या अनेक योजना राबवत आहे. तसेच योजनांच्या कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकारने छोट्या उद्योजकांसाठी ‘पीएम स्वनिधी योजना’ (PM Svanidhi Yojana) सुरू केली. या योजनेअंतर्गत विना व्याज कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. केंद्र सरकारनं कोरोना काळात पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली. या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

पीएम स्वनिधी योजनेबाबत..
छोट्या व्यावसायिकांना चालना मिळावी हा पीएम स्वनिधी योजनेचा उद्देश आहे. भारतात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वावलंबी भारत मोहिमेचा एक भाग म्हणून पीएम स्वनिधी निधी योजना सुरू केली होती. या योजनेमार्फत रस्त्यावरील विक्रेते 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

तसेच छोट्या व्यावसायिकांनी जर पहिले कर्ज दिलेल्या मुदतीत फेडले तरच पुढीलवेळी त्यांची कर्जाची मर्यादा वाढवून पहिल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर, 20 हजार रुपये आणि नंतर 50 हजार रुपयांपर्यंत वाढत जाते. ‘pm svanidhi scheme’

या योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेला हातगाडी किंवा रस्त्यावरील विक्रेते, छोटे व्यावसायिक, फळ,भाजीपाला विक्रेते, लॉन्ड्री, लहान सलून, पान दुकान मालक, फेरीवाले इत्यादींना कर्ज घेता येईल. या योजनेअंतर्गत 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी व्यवसाय करत असलेल्यांना कर्ज दिले जाणार आहे.

Buisness Loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बॅंकेत जाऊ शकता किंवा स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता, नाहीतर CSC केंद्रात जाऊन देखील करू शकता.

बॅंकेत असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारी बॅंकेत जावे लागेल.
तुम्हाला बॅंकेतून पीएम स्वनिधी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे. त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडून बॅंकेत जमा करायचे आहे.
यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून बॅंक मान्यता देईल.
तुमचा अर्ज मंजूर झाला तर बॅंक डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. pm svanidhi yojana in marathi

असा करा ऑनलाईन अर्ज
तुम्ही https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या साईटला भेट देऊन किंवा मोबाइल ॲप वापरून अर्ज करू शकता. तुम्ही या योजनेच्या अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन अर्ज करू शकता. ही माहिती पुढे इतरांना अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!