नदीमध्ये नाणं का टाकतात? स्मशानभूमीतून आल्यावर आंघोळ का करतात? जाणून घ्या अश्याच काही गोष्टींमागची शास्त्रीय कारणं..

आज आपण अश्याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या की आपण करतो, पण त्यामागाच्या वैज्ञानिक तथ्यांबद्दल आपल्याला माहिती नसते.

भारतात अशा बऱ्याच समजुती आहेत, ज्या आपण पाळतो तं खरं, पण आपण त्या का पाळतो हेच आपल्याला माहीत नसते. आज आपण अशाच काही समजुती आणि त्यामागच्या शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घेऊ.

आपल्या घरामधील वडील मंडळी आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी करायला सांगतात, ज्याच्या मागे कोणतेही तर्क नसते, आणि आश्चर्याची बाब म्हणजे, या गोष्टी करण्यामागचे कारण माहीत नसताना सुद्धा अनेक लोक या गोष्टींचे पालन सुद्धा करतात. परंतु, फक्त ऐकलेल्या गोष्टींचे पालन करणे ही एक अंधश्रद्धा आहे.

तुम्ही बऱ्याच जणांना घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवताना पाहिलेले असेल. लिंबू आणि मिरची लटकवल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो असे म्हणतात. पण या मागील वस्तुस्थिती वेगळीच आहे. वास्तविकत: लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि मिरची ही तिखट असते. जेव्हा ते दाराबाहेर टांगतात तेव्हा आंबट आणि तिखट वास कीटक आणि कोळी यांना घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखते. हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. कारण की, जेव्हा आरोग्य चांगले असेल तेव्हा तुम्ही चांगले कामही कराल आणि यशाचे मार्गही खुले होतील.

त्याचप्रमाणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचे कारण समजून न घेता आपण त्या करत असतो. पण कोणतीही प्रथा विनाकारण बनवली जात नाही. त्यामागे नक्कीच काही-तरी कारण दडलेले असते. आज आपण अशाच काही गोष्टी समजून घेणार आहोत ज्या की आपण करतो, पण त्यामागे लपलेल्या वैज्ञानिक तथ्यांबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते.

नदीमध्ये नाणी फेकणे :

तुम्ही प्रवासा दरम्यान अनेकदा पाहिले असेल की जेव्हा आपण रेल्वे किंवा बस नदीच्या पुलावरून जाते तेव्हा अनेक-जण नदी मध्ये नाणी टाकतात. पण ते असं का करतात याचे कारण आपल्याला माहीतच नसते. पूर्वीच्या काळी तांब्याची नाणी वापरली जात होती, आणि तांब्यामध्ये पाणी शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे पूर्वीच्या वेळी कोणी नदीवरून जात असे तेव्हा ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्यामध्ये तांब्याचे नाणे टाकत असे. आणि हळूहळू तो एक ट्रेंड बनला, जो आजही प्रचलित आहे. आज तांब्याची नाणी नाहीत, पण तरीही बरेच जण आपले नशीब चमकेल, या धारणेने लोकं नदीत नाणी टाकतात.

प्रसूतीनंतर ४० दिवसांचा नियम :

जेव्हा एखाद्या महिलेची प्रसूती होते तेव्हा तिला ४० दिवस खोली न सोडल्याचा सल्ला दिला जातो. पण याचे खरे कारण असे की प्रसूती-नंतर महिलेचे शरीर खूपच अशक्त होते आणि तिला विशेष काळजी आणि विश्रांती घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीला काम करायला लावले तर ती अजूनच अडचणीत येईल. म्हणून त्या स्त्रीच्या सोईकरीता हे कडक नियम बनवले गेले. ज्याचे आजही पालन केले जाते.

स्मशानभूमीतून परतल्यानंतर स्नान करणे :

स्मशानभूमीतून परत आल्यावर सर्वजण आंघोळ करतात. या मागेही शास्त्रीय कारण आहे. वास्तविकत: मृत शरीरामध्ये हानिकारक जीवाणू वाढत असतात. आणि स्मशानभूमी मध्ये अशा अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असतात. या परीस्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक या जीवाणूंच्या संपर्कात येतात. त्यामुळे स्मशानभूमीतून परतल्यावर स्नान करणे आवश्यक आहे.

मांजर आडवी जाणे :

कोठेही जात असताना आपल्या समोर मांजर आडवी गेली, तर तिथेच थोडा वेळ उभं राहून नंतर प्रवास सुरु करावा; नसता कामात अडचण येते, असे म्हणतात. त्यामुळेच मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते. मांजर आडवे गेल्यावर अनेकजण रस्ता बदलतात. पण असं का करतात, ते जाणून घ्या..

खरे तर पूर्वी लोक व्यवसाया निमित्त बैलगाडी आणि घोडे यांनी प्रवास करत असे, रात्रीच्या वेळी मांजर जंगलातून जात असताना दिसले तर तिचे डोळे चमकतात, ज्यामुळे बैल आणि घोडे घाबरतात. त्यामुळे रस्त्यावरून मांजर जाताना पाहिल्यानंतर लोक काही काळ प्रवास थांबवायचे आणि मांजर गेल्यावर पुन्हा प्रवास सुरु करायचे. हळु-हळु या गोष्टीचा अर्थ बदलला आणि लोकांनी मांजर आडवे जाणे हे अशुभ मानले गेले.



(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!