टोलवसुली करून तुम्हालाही कमवतात येणार पैसे; गडकरी आणणार पुढील महिन्यात जबरदस्त योजना..

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय मिळून मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. रस्ते बनवण्यासाठी लागणारा पैसा जमविण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठा प्लॅन आखला असून यामध्ये १० पब्लिक इंफ्रा इनवेस्‍टमेंट ट्रस्‍ट (InvITs) जारी केल्या जाणार आहेत. NHAI या ईन्व्हीट्सद्वारे सामान्य गुंतवणूकदारांना सुद्धा त्यांचा पैसा गुंतवण्याची संधी सरकार तर्फे देण्यात येणार आहे.

दरवर्षी रस्ते बनवण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात. यासाठी कंपन्याना बँकांकडून कर्ज घ्यावे लागते आणि ते कर्ज फेडण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे या कंपन्यांनी बँका ऐवजी लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना त्या पैश्यावर व्याज देण्याची कल्पना नितीन गडकरी यांनी मांडली असून मनीकंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Infrastructure Investment Trust) हे म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्टसारखेच असते. त्यामध्ये पायाभूत सुविधा उभारणीकरीता संभाव्य वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार उत्पन्नाचा एक छोट्याश्या भागासाठी अगदी छोटी रक्कम देखील गुंतवू शकतात.

प्रथम छोट्या गुंतवणूकदारांना पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या प्रकल्पांत पैसे गुंतविण्याची संधी दिली जाईल. हे ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ (InvITs) द्वारे होईल. यामध्ये कमीत कमीत १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ८% निश्चित परतावा देण्याची तरतूद केली असून या गुंतवणुकीची हमी सरकार असणार आहे. यामुळे हा पूर्ण पैसा १००% पैसा सुरक्षित राहणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच, गुंतवणूकदारांनी कमावलेल्या नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा करातूनसुद्धा सूट देण्याचा विचार सुरु असल्याचे गडकरी म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!