कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिट; दा विंची एक्स इन्टिट्यूव्हचे चौथे जनरेशन सिस्टीम..

– मराठवाड्यातील पहिली आणि एकमेव जागतिक कीर्तीची ‘दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’
– रोबोटिक सर्जरीमध्ये अत्याधुनिक चौथ्या पिढीचे तंत्रज्ञान
– वाजवी दरात उच्चस्तरीय शस्त्रक्रिया

औरंगाबाद : कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने, मराठवाडा व परिसरातील रुग्णांना वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णालयाने अमेरिका स्थित, नाविन्यपूर्ण अशी आरएएस तंत्रज्ञानांपैकी एक, दा विंची एक्स प्रणाली स्थापित केले आहे. मराठवाड्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना वाजवी दरात प्रगत आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी ही अत्याधुनिक प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या अत्याधुनिक युनिटविषयीची माहिती देताना विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सी. पी. त्रिपाठी म्हणाले, “विविध प्रकारच्या आजारांचे निदान करण्यासाठी कमलनयन बजाज रुग्णालयाने सर्वोत्तम सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही आधुनिक रोबोटिक- सहाय्यक शस्त्रक्रिया प्रणालींपैकी एक स्थापित केली आहे, दा विंची एक्स (चौथे जनरेशन सिस्टीम) जी अनेक जटिल शस्त्रक्रियांच्या बाबतीत अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे मराठवाड्यातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे रुग्णाचे होणारे आर्थिक नुकसानही न होता सर्वोत्तम शस्त्रक्रिया उपचार मिळू शकतील.”

मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा पुढे म्हणाल्या की, ”रोबोटिक-सहाय्यक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जसे की लहान चीरे आणि कमी रक्तस्त्राव, ज्यामुळे जखम अत्यंत कमी काळात जुळून येते व रुग्णाला होणारा त्रासही कमी होतो. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना थ्रीडी हाय डेफिनेशन दृश्यासह अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया करण्यास मदत होते. कारण ते त्यांना अंतर्गत अवयवांना अधिक चांगले दृश्यमानता प्रदान करते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदना कमी होतात. रुग्णालयातील अत्यंत अनुभवी शल्यचिकित्सक आता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि सर्वोत्तम रुग्णसेवा प्रदान करण्यास उत्सुक आहेत.

कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये रोबोटिक सहाय्यक सर्जरीच्या सुविधेविषयी बोलताना इन्टिट्यूव्ह इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट व जनरल मॅनेजर, श्री. मनदीप सिंग कुमार म्हणाले की, “कमलनयन बजाज रुग्णालय मराठवाड्यातील सर्व घटकांपर्यंत सर्वोत्कृष्ट सर्जिकल तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. इन्टिट्यूव्हचा विश्वास आहे की, या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना अनेक जटिल शस्त्रक्रिया सहजतेने करण्यास सक्षम केले जाऊ शकते. म्हणूनच, कमलनयन बजाज रुग्णालयासारख्या अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था, रोबोटिक-सहाय्यक शस्त्रक्रियेसाठी, विशेषत: सुधारित वैद्यकीय परिणामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, दा विंची: ह्या नवीनतम तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे पाहून आम्ही प्रोत्साहित होतो. इन्टिट्यूव्ह रोबोटिक प्रोग्रामच्या स्थापने द्वारे, रुग्णालयाची दूरदृष्टी आणि आमच्या तंत्रज्ञानावरील विश्वास, तसेच डॉक्टरांना प्रभावी उपचार करण्यास मदत करण्याची त्यांची सक्रियता दर्शवते.” गेल्या काही वर्षांपासून भारतात रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेची मागणी वाढत आहे. ही मागणी केवळ रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रिया प्रदान करू शकणाऱ्या सुधारित रुग्ण परिणामांच्या संभाव्यतेमुळेच नव्हे, तर भारतातील सर्जन समुदायातील उत्कट आणि कुशल रोबोटिक सर्जनच्या वाढत्या संख्येच्या साक्षीने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या उत्साहाने देखील प्रेरित आहे.

आरएएसच्या फायद्यांवर भाष्य करताना, वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. राजेश सावजी, म्हणाले, “रोबोटिक-असिस्टेड सर्जरी (RAS) शल्यचिकित्सकांना अधिक अचूक, लवचिकता आणि नियंत्रणासह अनेक प्रकारच्या जटिल शस्त्रक्रिया करण्याची क्षमता प्रदान करू शकते. अधिक शस्त्रक्रिया क्षमता आणि रुग्णाच्या सुधारित परिणामांची संभाव्यता ही दोन कारणे आहेत ज्यामुळे आम्ही आरएएसला प्राधान्य देतो, विशेषत: ज्या प्रक्रियेसाठी अचूक शस्त्रक्रिया हस्तक्षेप आवश्यक असतो. यामध्ये कर्करोगाच्या गंभीर प्रकारांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश आहे जो या भागात अधिकाधिक सामान्य होत आहेत. रुग्णांना आरएएसचे काही फायदे म्हणजे लहान चीरे, कमी जखम आणि कमी वेदना.” या तंत्राचा वापर करून अन्ननलिका, आतडे, गुदाशय, गर्भाशय, किडनी व ईतर जटिल कर्करोग शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे करता येतात. परिणामी, रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी तसेच जलद गतीने रोगमुक्तता करण्यास मदत होते.

कमलनय बजाज रुग्णालयात आम्ही मागील चार महिन्यात या रोबोटिक प्रणालीच्या तंत्राद्वारे अन्ननलिका, किडनी, प्रोस्टेट तसेच कर्करोग रुग्णाची आंशिक मूत्रपिंड काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ई. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. विशेष बाब म्हणजे, किडनी दात्याची आंशिक मुत्रपिंड काढुन टाकण्याची रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे कमलनयन बजाज रुग्णालय हे मराठवाड्यातील पहिलेच केंद्र आहे.
तंत्रज्ञान वापरण्याबाबत बोलताना डॉ. आदित्य येळीकर, युरोसर्जरी व किडनी प्रत्यारोपण शल्यचिकित्सक म्हणाले, “आम्ही हॉस्पिटलमध्ये सादर केलेल्या नवीनतम दा विंची तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले आहे. आम्ही रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्त्राव होणे, हॉस्पिटलमधील कालावधी आणि शस्त्रक्रियेनंतरची अस्वस्थता लक्षणीयरीत्या कमी करणे, याबाबतीत चांगले परिणाम पाहत आहोत. हे फायदे, मला आणि माझ्या टीमला आमच्या रुग्णांना सामान्य जीवनप्रणाली लवकर अवलंबवण्यास सक्षम बनवतात.”
डॉ. ए.एम ढमढेरे – वरिष्ठ शल्यचिकित्सक व मूळव्याध शल्यचिकित्सक, डॉ. मिलिंद वैष्णव – वैद्यकीय संचालक, डॉ. प्रेरणा देवधर – स्त्रीरोग तज्ज्ञ आणि डॉ. शिवाजी तौर, शल्यचिकित्सक याप्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने, येणाऱ्या कालावधीत रुग्णांना होणाऱ्या फायद्याबद्दल आश्वास्तता दर्शवली.

कमलनयन बजाज रुग्णालय हे तीन दशकांपासून वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये नेहमीच आघाडीवर आहे आणि नवीनतम निदान, वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपकरणे आणि प्रगत प्रक्रियात्मक सुविधांची संपूर्ण श्रेणी प्रदान करते. हे रुग्णालय उच्च गुणवत्तेची आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे आणि औरंगाबादमधील एक विश्वासार्ह सेवा देणारे रुग्णालय म्हणून विकसित झाले आहे. याच्या स्थापनेमुळे, मराठवाड्यातील रुग्णांना तज्ञ वैद्यकीय सेवा आणि उपचारांचा लाभ घेण्यासाठी प्रवास करण्याची किंवा कोणत्याही गैरसोयीला सामोरे जाण्याची गरज पडणार नाही, यासाठी रुग्णालय लोकांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या आपल्या प्रमुख उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!