महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची जंबो भरती..

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या होतकरू तरुणांसाठी खूशखबर आहे. पोलिस भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली असून राज्यात लवकरच 7000 जागांकरीता जंबो पोलिस भरती होणार आहे.

गृहविभागातर्फे 7000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरतीची प्रक्रिया जून महिन्याt पार पडण्याची शक्यता असून लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया पार पडणार असून एकूण 7000 पदे भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 7000 पदांच्या भरतीनंतर राज्यात आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोरोनामुळे रखडली होती पोलिस भरती

राज्यमध्ये दोन वर्षां पूर्वी पोलिस भरतीची प्रक्रिया पार पडणार होती. राज्य सरकारने तसे नियोजन देखील केले होते. मात्र, संपूर्ण जगात कोरोना महामारीचा संसर्ग पसरल्यामुळे पोलिस भरती रखडली आणि राज्यात पूर्ण क्षमतेने पोलिस भरती होऊ शकली नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलिस भरती करण्याबाबत सुचक वक्तव्य देखील केले होते.

पोलीसभरती आज ना उद्या होईल या आशेवर राज्य भरातील हजारो तरुण तयारी करत असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे डोळे नेहमीच पोलिस भरतीकडे लागलेले असतात. त्यामुळे आता उशीरा का होईना पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तयारी करत असलेल्या तरुणांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!