घराचे बांधकाम करणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण..

लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी म्हण प्रचलित आहे. कारण म्हणजे, लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी करताना जीवाची बाजी लावली जाते. त्यामुळेच तर घराचे बांधकाम करतांना बाजार भावात बांधकाम वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊनच आपण घर बांधायला सुरुवात करतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर आपल्यासाठी खुशखबर आहे. कारण की, बांधकामासाठी लागलेल्या स्टीलच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

घर बांधताना आपण स्वस्त-महाग या सर्वबाबींचा विचार करतो. मात्र, रशिया-युक्रेन युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागले होतं. बांधकाम स्टीलचे भावतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी मालाचा स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किंमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती.

मार्च महिन्यामध्ये बांधकाम सळयांची किंमत 70 हजार रुपये प्रति टन म्हणजेच 70 रुपये प्रति किलो होती. मात्र, मे महिन्यामध्ये सळ्यांच्या किंमतीत घट झाली असून एप्रिल महिन्यामध्ये 76 रुपये किलो असलेले स्टील मे महिन्यामध्ये 61,525 रुपये टनां वर पोहोचले आहे. म्हणजेच, बाजारात आत्ता 61-62 रुपये किलो दर आहेत.

स्टीलचे विक्रेते युसूफ लोखंडवाला यांनी सांगितले की, यापूर्वी लोखंडाच्या किंमतीमध्ये दिवसाला 100-200 रुपयांची वाढ होत होती. आता, एका दिवसामध्ये 1000-2000 रुपयांची चढ-उतार होत आहे. मागील काही दिवसांमध्ये लोखंडाचे दर 3000 रुपयांनी दर कमी झाले होते. मे-जून महिन्यामध्ये लोखंड सर्वाधिक विकले जाते. मात्र, कोरोना आणि तेजी-मंदीमुळे लोखंड विक्रीच्या व्यवसायात यावेळेस 40 टक्केच खरेदी दिसून आली.

बाजार भावामध्ये होत असलेल्या चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. कारण, व्यापारी कंपनीकडून वाढलेल्या दराने माल मागवतात. मात्र, गाडी दुकानात पोहोचेपर्यंत भाव पुन्हा कमी झालेले असतात. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी माल स्टॉक करणे बंद केल्याचे लोखंडवाला यांनी सांगितले. दरम्यान, सध्या स्टीलचे भाव कमी झाल्याने घर बांधकाम करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे.

Similar Posts