महागाईचा पुन्हा भडका: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांच्या पुढे..

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेले असताना इंधन आणि गॅस सिलिंडर मधील दरवाढ सुरुच आहे. आज गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. या बरोबरच देशात LPG सिलिंडरची किंमत 1 हजार 5 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच होरपळत असताना गॅसच्या दरवाढीमुळे त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

व्यावसायिकांच्या अडचणीत सुद्धा वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 8 रुपयांनी दरवाढ करण्यात आली असून या दर वाढीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 2 हजार तीनशे 54 रुपये मोजावे लागणार आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसाठी नवीन दर 2454 रुपये, 2306 रुपये आणि 2507 रुपये आहेत. ठेला, हातगाडी, लहान हॉटेल, अशा किरकोळ व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

यापूर्वी 7 मे 2022 रोजी झाली होती दरवाढ

7 मे 2022 रोजी देशामध्ये घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळेस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोन वेळेस वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतीही तेव्हा 8 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

देशामधील प्रमुख शहरांतील घरगुती सिलिंडरचे दर (14.2 किलोग्राम)

दिल्ली-1003 रुपये
कोलकाता-1029 रुपये
मुंबई-1002.50 रुपये
चेन्नई- 1018.50 रुपये

19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर

दिल्ली- 2354 रुपये
कोलकाता-2454 रुपये
मुंबई-2306 रुपये
चेन्नई- 2507 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!