बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..

महाराष्ट्राचे रोजगर हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा मधील विभागीय क्रीडा संकुलाजवळील संपर्क कार्यालया बाहेर लावलेल्या बॅनरला शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन व्यक्तीनी काळे फासल्यामुळे आज सकाळपासून भूमरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयांवर, घरावर, राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने व तोडफोड करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरमधील गारखेडा परिसरामध्ये रोहीयो मंत्री भुमरे यांचे विभागीय व संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर मोठा बॅनर लावलेला आहे. या बॅनरवरील भुमरे यांच्याच छायाचित्राला रात्री बिगर नंबरच्या मोटासायकलवर आलेल्या दोन तरुणांनी काळे फासले. सदरील तरुणांच्या तोंडाला रुमाल असल्यामुळे सुरक्षारक्षकाला ते ओळखू आले नाही. या सुरक्षारक्षकाने लगेचच बॅनरवर टाकलेला काळा रंग धुऊन काढला.

पोलिसांची घेतली घटनास्थळी धाव :
गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहरतील आणि जिल्ह्यातील ५ आमदारांचा समावेश असून या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा गस्त वाढविण्यात आली आहे. संदीपान भुमरे यांच्या बॅनर वरील फोटोला काळे फासल्याची माहिती समजल्यावर जवाहरनगरचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

Similar Posts