जन धन खातेधारकांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार…!

जन धन खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचे जन-धन खाते असेल तर तुम्हाला दर महिन्याला 3000 रूपये मिळणार आहेत.

काय आहे सरकारची योजना

‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ असं या योजनेचं नाव असून या योजनेमध्ये सरकार जन-धन खाते धारकांना दर महिन्याला 3000 रूपये ट्रान्सफर करणार असून हे पैसे पेंशन स्वरूपामध्ये मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ योजनेत 18 ते 40 वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. जेव्हा ती व्यक्ती 60 वर्षाची होईल तेव्हा या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये एका वर्षात 36000 ट्रान्सफर केले जातात.

भारतीय पशुसंवर्धन महामंडळात 4936 विविध पदांची भरती..!

कोणाला होईल या योजनेचा लाभ?
या योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना होणार असून स्ट्रीट वेंडर, मिड-डे मील वर्कर, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, रिक्षा चालक आणि धोबी इ. कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शिवाय, ज्याचे महिन्याचे उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा कमी आहे ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आवश्यक कागदपत्र :
या योजनेचा लाभ घेण्याकरीता तुमचे जन-धन खाते असणे आवश्यक आहे. शिवाय तुमच्याकडे आधार कार्ड देखील असावे. तसेच तुम्हाला तुमच्या बचत खात्याची माहिती बँकेमध्ये द्यावी लागेल.

किती भरावा लागेल हप्ता?
या योजनेंतर्गत विविध वयोगटाप्रमाणे प्रत्येक महिन्याला 55 ते 200 ₹ भरावे लागतील. जर तुमचे वय 18 असेल तर तुम्हाला दर महिन्याला 55 रूपये, 30 वर्षाच्या व्यक्तीला 100 रुपये आणि 40 वर्षाच्या व्यक्तीला 200 रूपये भरावे लागणार आहे. या योजनेमध्ये नाव नोंदवण्यासाठी तुमच्या बचत खात्याचा किंवा जन-धन खात्याता IFSC कोड असणे गरजे आहे.

Similar Posts