व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकरीता महत्वाची बातमी, खोटं नाव टाकल्यास ‘ही’ सुविधा होणार बंद..!

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहे जे की त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर असं नाव लिहितात जे मजेदार जसे की, किंग, angle, भाऊ, शेठ किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचेसुद्धा नाव लिहितात. मात्र आता व्हॉट्सॲपवर तुम्हाला तुमचे खरे नाव जे की, सरकारी कागदपत्रांवर आहे तेच नाव लिहावं लागणार आहे. कारण, जर का तुम्ही असे केले नाही तर तुम्ही या व्हॉट्सअ‍ॅपच्या महत्त्वाच्या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

आता तुम्हाला तुमच्या वापरकर्ता नावामध्ये कायदेशीर नाव टाकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. अन्यथा तुम्ही WhatsApp पेमेंटचा उपयोग घेऊ शकणार नाही. जर तुम्ही ही सुविधा वापरत असाल तर तुम्ही हे तेव्हाच वापरू शकाल जेव्हा तुम्ही युजर नेमच्या जागी तुमचे अधिकृत नाव लिहिलं जाईल आणि तसे न केल्यास तुम्हाला पेमेंट करता येणार नाही.

UPI पेमेंटसाठी खरं नाव आवश्यक

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वेबसाइटवर अधिकृतपणे याची पुष्टी करतांना सांगितले की “ही आवश्यकता NPCI द्वारे सेट केली गेली आहे आणि UPI पेमेंट सिस्टम-मधील फसवणूक कमी करण्यासाठी केलेली आहे. UPI द्वारे तुमचे बँक खाते ओळखण्यासाठी WhatsApp तुमच्या खात्याशी लिंक केलेला फोन नंबर वापरतो. “तुमच्या बँक खात्याशी संबंधित नाव हे नाव शेअर केले जाईल. हा बदल iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी लागू आहे.

आतापर्यंत, WhatsApp वापरकर्ते प्रेषकाचे नाव स्वतः जोडू शकत होते. ज्यामध्ये 25 प्रकार असू शकतात, येथे इमोजी देखील आहेत. पण आता खरं नाव टाकनं सर्वांसाठी अनिवार्य आहे. पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या UPI लिंक केलेल्या बँक खात्यावर कायदेशीर नाव द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!