PVC PIPE-scheme 2023: पाईप लाईन अनुदान योजना॥

PVC PIPE-scheme आज आम्ही खास शेतकरी बंधूसाठी सरकारची एक भन्नाट योजना घेऊन आलो आहोत. या योजनेंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असून सरकारच्या या योजने चे नाव आहे पीव्हीसी पाइप लाईन अनुदान योजना (PVC PIPE-scheme).

महाराष्ट्र राज्यातले शेतकरी मित्र पाईप लाईन अनुदान (PVC PIPE-scheme) योजने बरोबरच शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी जसे की, ट्रॅक्टर अनुदान योजना, रोटाव्हेटर अनुदान योजना, कल्टीव्हेटर अनुदान योजना, तुषार/ठिबक सिंचन अनुदान योजना, विहीर अनुदान योजने बरोबरच इतर महत्वाच्या योजनेसाठी mhadbt च्या अधिकृत वेबसाईटवर सगळ्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

PVC PIPE-scheme पीव्हीसी पाईप लाईनसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

  • सर्वात पहिले तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर/लॅपटॉप/टॅब्लेटच्या ब्रॉउझरमध्ये mahadbt farmer टाइप करून सर्चवर क्लिक करा.
  • नंतर तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर/लॅपटॉप/टॅब्लेटच्या स्क्रीनवर mahadbt या संकेतस्थळाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक दिसेल.
  • त्या अधिकृत लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर/लॅपटॉप/टॅब्लेटच्या स्क्रीनवर mahadbt वेबसाईटचा पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी शेतकरी मित्रांनी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड प्रविष्ट करून लॉग-इन करावे.
PVC PIPE-scheme
  • लॉग-इन केल्यावर तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर/लॅपटॉप/टॅब्लेटच्या स्क्रीनवर एक dashboard दिसेल,
  • त्या dashboard वर अर्ज कर अश्या आशयाची एक निळ्या कलरची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा,
  • त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला पाईप लाईन अनुदान (PVC PIPE-scheme) योजनेसंबंधीची संपूर्ण सूचना लिहलेली दिसेल, ती सूचना व्यवस्थित वाचून घ्यावी,
  • त्यानंतर मेनू पर्यायावर क्लिक करून सिंचन साधने आणि सुविधा या पर्याया समोर बाबी या पर्यायची निवड करावी,
  • त्यानंतर तुमचं जिल्हा, नंतर तालुका, नंतर गाव, नंतर तुमचं सर्वे क्रमांक अशी सर्व आवश्यक ती माहिती टाकावी,
  • त्यानंतर घटक या पर्यायकरिता पाईप्स या पर्यायची निवड करावी,
PVC PIPE-scheme
  • त्यानंतर तुमच्यासमोर उपघटक यामध्ये अनेक पर्यायामधून PVC PIPE-scheme या पर्यायची निवड करा.
  • नंतर तुम्हाला तुमच्या शेतात किती मीटर लांबीची पाइप लाइन करायची आहे, त्याची माहिती टाका,
  • त्यानंतर तुमचं अर्ज सबमीट करा वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पहा हा पर्याय ओपन होईल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर योजनांना प्राधान्य या पर्यायावर क्लिक करून पेमेंट पूर्ण करा,
  • त्यानंतर पैसे भरल्याची पावती आणि अर्ज सादर केल्याची पावती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सांभाळून ठेवावी.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

फक्त गट नंबर टाकून मोफत डाउनलोड करा तुमच्या जमिनीचा नकाशा

Similar Posts