E-Peek Pahani 2023 | ई-पीक पाहणी करायची? जाणून घ्या ई-पीक पाहणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया

E-Peek Pahani: शेतकरी मित्रांमध्ये सध्या ई-पीक पाहणीविषयी बरीच चर्चा सुरू असून ई-पीक पाहणी हा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार राबवत आहे. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना स्वत: त्यांच्या हातातल्या मोबाईलद्वारे त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करता येणार आहे.

E-Peek Pahani

यावेळी खरिप हंगामामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावरील ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) पूर्ण झाली असून अद्यापही सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त हेक्टर शेतातील पीक पाहणी करणे बाकी आहे.

चालू वर्ष 2023 मध्ये पिकांची नोंद करण्याकरिता 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत तलाठी स्तरावर पीक पाहणी करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्याही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही त्यांना त्यांच्या शेतातील पीक पाहणी तलाठ्यांमार्फत करावी लागणार आहे.

मोबाईलवर ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) कशी करालं?

E-Peek Pahani
 • ई-पीक पाहणी ॲपचा वापर करून पिकांची नोंद करण्याकरिता सगळ्यांत आगिदर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी हे एप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी प्ले-स्टोअरवर ओपन करायचे आहे.
 • प्ले स्टोअरवर E-Peek Pahani सर्च करून तुमच्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करायचं आहे.
 • ॲप्लीकेशनचे इस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर E-Peek Pahani ॲपला ओपन करायचं आहे.
 • त्यानंतर ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) नावाचं एक पेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन होईल. याला डावीकडे स्क्रोल केल्यास हे ॲप वापरण्याकरिता लागणारी आवश्यक ती सर्व माहिती तिथं दिसेल.
E-Peek Pahani
 • परत एकदा डावीकडे स्क्रोल केल्यास पिकांची नोंदणी करण्याकरिता ज्या आवश्यक बाबींची मदत होइल, त्या इथं दिलेल्या असतील. म्हणजे जसे की सातबारा, 8-अ इ.
 • त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा महसूल विभाग निवडावा लागणार आहे.
 • त्यानंतर शेतकऱ्यांना नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
 • आता इथे सुरुवातीला त्यांचा विभाग, नंतर जिल्हा, नंतर तालुका आणि सर्वात शेवटी त्यांचा गाव निवडून पुढे जावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्याने पहिले नाव, नंतर मधले नाव अथवा त्यांचे आडनाव, बरोबरच त्यांचे खाते क्रमांक/गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदारची निवड करू शकता.
E-Peek Pahani
 • आता त्यांनतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून गट क्रमांक टाकून मग शोधा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 • पुढे त्या गटामधील खातेदार निवडून खातेदाराचं नाव आणि खातेदाराचे खाते क्रमांक व्यवस्थित तपासून पुढे जायचं आहे.
 • त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सांकेतांक पाठवा नावाचे एक पेज ओपन होईल
 • त्यामध्ये आपली नोंदणी आपण दिलेल्या खालील मोबाईल नंबरवर करण्यात येत असल्याची सूचना तिथं लिहलेली दिसेल. पण का जर तुम्हाला तो क्रमांक बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदलावर टच करा, नंतर दुसरा मोबाईल क्रमांक टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर टच करा
 • आता तुम्ही मागील वर्षी E-Peek Pahani या ॲपवर नोंदणी केलेली असल्यास तुम्हाला तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे का? असा संदेश येईल. पण जर का तुम्ही यावर्षीच आणि पहिल्यांदाच E-Peek Pahani या ॲपवर नोंदणी करत असाल तर तसा संदेश येणार नाही.
 • असो आता पुढे ‘हो’ या पर्यायावर टच करा.
 • नंतर खातेदाराचं नाव निवडून सांकेतांक विसरलात या पर्यायावरवर टच करा आणि नंतर सांकेतांक क्रमांक प्रविष्ट करा. पुढे ब्लँक स्क्रीन झाली, तर मात्र होम या पर्यायावर टच करा. आता पीक पाहणीच्या (E-Peek Pahani) या ॲपवर तुम्हाला तुमच्या पिकांची नोंद करता येईल.
 • आता शेतकरी मित्रांना पिकांची माहिती नोंदवा या पर्यायावर टच करून नंतर खाते क्रमांक, नंतर गट क्रमांक निवडला की आपोआपच लागवडीखाली असलेल्या संपूर्ण जमिनीचं एकूण क्षेत्र व पोटखराब क्षेत्र तिथं दिसेल.
 • नंतर खरीप हंगामाची निवड करून नंतर पिकाचा वर्ग म्हणजे निर्भेळ पीक आहे किंवा मिश्र पीक आहे किंवा इतर पीक आहे ते निवडा. नंतर पिकाचा प्रकार, पिकांची नावे तसेच क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाका.
E-Peek Pahani
 • एकदा का ही संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जल सिंचनाचे साधन म्हणजे विहीर की शेत तलाव निवडून नंतर सिंचनाची पद्धत आणि लागवडीचा दिनांक निवडायचा आहे
 • नंतर अक्षांश-रेखांश मिळवा या पर्यायावर टच करा आणि मग शेवटी पीकांचा फोटो काढा या पर्यायावर टच करून पिकाचा फोटो अपलोड करा. लक्षात ठेवा मित्रांनो हा फोटो तुम्हाला तुमच्याच शेतातून अपलोड करणे बंधनकारक आहे.
E-Peek Pahani
 • फोटो काढल्यावर बरोबरच्या म्हणजेच ✓ या खुणेवर क्लिक करून तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल, त्याखाली स्वयंघोषणेवर टिक करून पुढे जा.
 • एकदा का पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली अशी सूचना आल्यावर ठीक आहे वर क्लिक करा.
 • तुम्ही नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्याकरिता पिकांची माहिती पाहा या पर्यायावर टच करून तुम्ही ती माहिती पाहू शकता.
 • याच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गटातील पिकांची नोंद करायची असल्यास वर सांगितलेली संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागणार आहे. आणि सर्वात शेवटी अपलोड या पर्यायावर टच करून संपूर्ण माहिती अपलोड करावी लागणार आहे.
 • याच प्रकारे या E-Peek Pahani या ॲपवरून तुम्ही तुमच्या शेटेल कायम पड आणि बांधावरची झाडांची सुद्धा नोंद करू शकता. याशिवाय गावातील इतर खातेदारांची पीक पाहणीची माहिती देखील तुम्हाला पाहता येईल.
E-Peek Pahani

ई-पीक पाहणीचे फायदे काय? E-Peek Pahani benefit

ई-पीक पाहणी करत असताना तुम्ही दिलेली सर्व माहिती ही चार प्रकारचे लाभ देण्याकरिता वापरली जात असते.

१) MSP मिळवण्याकरिता-
जर तुम्हाला तुमचा शेतमधील शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विकायचा असल्यास त्यासाठी तुमच्या संमतीने हा पूर्ण डेटाचा वापर करण्यात येऊ शकतो.

२) पीक कर्जाच्या पडताळणीकरिता –
शेतकर्यांनी ज्या कोणत्या पिकावर कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनी तेच पिक लावलंय का, यासाठीची पडताळणी बँक हा डेटा बघून करू शकते. सद्यस्थितीत सुमारे 100 पेक्षा जास्त बँका या डेटाचा वापर करत आहे.

३) पीक विमा योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी
पीक विम्यासाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदवलेलं पीक, यात काही तफावत आढळल्यास पीक पाहणीमधील पीक हेच अंतिम मानले जातं.

४) नुकसान भरपाईसाठी –
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी या डेटाचा वापर करण्यात येतो

Poultry Farming Scheme : 1000 अंड्यावरील कोंबड्यांकरिता 25 लाख रुपये अनुदान 2023

महाराष्ट्र की बेटीयो को सरकार देगी 1 लाख 1 हजार रुपये : जाने इस योजना के बारे मे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!