Aavdel Tithe Pravas 2023: पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये; ही आहे MSRTCची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

Aavdel Tithe Pravas : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC) प्रवाशांच्या फायदा होण्यासाठी बऱ्याचदा निरनिराळ्या प्रवासाच्या योजना तसेच उपक्रम राबवत असतात. 1100 Rupayat Bus Pravas

म्हणूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC)ने खास आपल्या प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली असून त्या योजनेचे नाव आहे ‘आवडेल तेथे प्रवास योजना’ Aavdel Tehte Pravas.

Aavdel Tithe Pravas

‘आवडेल तेथे प्रवास योजना’ Aavdel Tihte Pravas ही योजना सन 1988 पासून करण्यात आली असून आपल्या प्रवाशांसोबत स्नेह आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण होण्यासाठी आणि त्यांना कमीत कमी खर्चामध्ये राज्यातील निरनिराळ्या ठिकाणी जसे की, पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणांन बरोबरच सणासुदीच्या काळात आपल्या प्रियजनांना भेट देता यावी, लग्नसराईचा उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्याबरोबरच अत्यंत कमी खर्चामध्ये प्रवासाचा आनंद लुटता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC)ने खास प्रवाशांसाठी “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tehte Pravas हि योजना सुरू केली आहे.

‘आवडेल तेथे प्रवास’ Aavdel Tihte Pravas या योजनेअंतर्गत प्रवाश्यांना चार दिवसाचा पास देण्यात येतो. खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या सोयी-सुविधा बरोबरच वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंगसोबत स्पर्धा असताना देखील नागरिक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC)च्या “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tehte Pravas ह्या योजनेला चांगलाच प्रतिसाद देत आहे.

“आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tihte Pravas योजनेअंतर्गत चार दिवसांच्या पासकरिता संपूर्ण वर्षातून 2 फेऱ्या म्हणजेच वर्षातील 2 हंगाम निश्चित करण्यात आलेले आहेत. या हंगामात 15 ऑक्टोबर ते 14 जून हा एक गर्दीचा हंगाम तर 15 जून ते 14 ऑक्टोबर हा दुसरा कमी गर्दीचा हंगाम असल्याचे ठरवले गेले आहे. आणि याच कारणामुळे दोन्ही हंगामातील किंमतीमध्ये देखील थोडफारी तफावत असेल असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC) तर्फे सूचित करण्यात आलेले आहे.

“आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tihte Pravas योजनेमध्ये सरकारी महामंडळाच्या ज्याही गाड्या उपलब्ध जसे शिवनेरी बस, शिवशाही बस, हिरकणी बस, साधी बस (ज्याला साधारण भाषेत लाल डब्बा बस असे म्हटले जाते) या सर्व निवड केली जाते. या योजनेंतर्गत प्रवाशी संपूर्ण राज्यामध्ये चार दिवस आणि चार रात्र कोठेही, केव्हाही आणि कितीही प्रवास करू शकतात.

“आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tehte Pravas योजनेत चार दिवसांसाठी लाल एसटी बसच्या पासची किंमत प्रति प्रवाशी – 965 रुपये, निम-आराम बससाठी प्रती-प्रवाशी – 1150 तर शिवशाही बससाठी प्रती-प्रवाशी – 1205 रुपये ठरलेली आहे. या योजने-अंतर्गत महारष्ट्र राज्यातील नागरिक राज्यामधील धार्मिक स्थळे जसे तुळजापूर/अक्कलकोट/गणपतीमुळे तसेच लग्न-सराई प्रसंगी देखील या “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tihte Pravas योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतात.

Aavdel Tithe Pravas योजनेच्या अटी व शर्ती

 • ज्या प्रवाशांनी “आवडेल तेथे प्रवास” या योजनेंतर्गत पास काढलेला असल्यास ते प्रवास करत असेल तर अश्या प्रवाशांना ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश त्यांचा नाकारता येणार नाही.
 • ज्या प्रवाशांनी पास काढला आहेत आणि ते त्यांच्या आवडत्या सीटवर हक्क बजावत असल्यास ते या पासचा गैरवापर करत असल्याचे मानण्यात येईल.
 • “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tehte Pravas योजनेचा पास गहाळ/हरवल्यास झाल्यास त्याऐवजी कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा पास देण्यात येणार नाही, याचा अर्थ या योजनेचा पास सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी हि पास धारकांचीच राहील.
 • जर कोणताही प्रवाशी या पासचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले असेल तर त्याचा पास हा विनाविलंब जप्त करण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत प्रवास करताना प्रवश्याची कोणतीही मौल्यवान वस्तू जसे की दागिने, मोबाईल, पैसे गहाळ/ चोरी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पास धारकाची राहणार असून त्याकरिता एसटी महामंडळ जबाबदार ठरवता येणार नाही.
 • “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tehte Pravas या योजनेअंतर्गत पासची चार दिवसांची वैधता संपली असल्यास आणि तरी सुद्धा तो प्रवाशी प्रवास करत असेल तर त्याच्याकडून संपूर्ण तिकीटाचे पैसे बरोबरच दंड सुद्धा वसूल करण्यात येईल.

महाराष्ट्रातील मुलींना मिळणार 75000 रुपये: जाणून घ्या सरकारच्या या योजनेबद्दल

 • या योजनेचा पास ज्या नागरिकांना जारी करण्यात आला आहे फक्त आणि फक्त त्याच नागरिकांना प्रवास करण्याची मुभा राहील, याचा अर्थ म्हणजे हा पास अहस्तांतरणीय आहे.
 • “आवडेल तेथे प्रवास” Aavdel Tihte Pravas या योजनेंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००:०० ते २४:०० या वेळेप्रमाणे करण्यात येते, प्रवाशांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा.
 • पासच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी नागरिक २४:०० वाजेच्या नंतर प्रवास करत असल्यास त्याला पुढील प्रवासाकरिता पुढील प्रवासाचे तिकीट घेणे बंधनकारक असेल, आणि तो त्यासाठी वाहकाशी कसलाही प्रकारचा वाद घालणार नाही.
 • काही कारणास्तव बसगाडी सुटण्यास उशिर झाला, अथवा रस्त्यात बसगाडीमध्ये काही बिघाड झाल्यास तसेच इतर कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव बस ज्याची नियोजित पोहचण्याची वेळ २४:०० वाजेपूर्वी होती आणि ती २४:०० वाजेनंतर पोहचल्यास व पास धारकाचा प्रवास खंडित झालेला नसल्यास त्या पासधारकांकडून वेगळ्या तिकिटाचे पैसे वसूल करण्यात येणार नाही.
 • एखादेवेळी कर्मचारी संप असल्यामुळे एस.टी. बसगाडीची वाहतूक विस्कळित झाल्यास आणि पासधारक त्या पासावर प्रवास न करू शकल्यास पास धारकांना प्रवास न केलेल्या तेवढ्या दिवसांचा संपूर्ण परतावा अथवा मुदतवाढ देण्यात येणार येतो, तसेच परताव्याची रक्कम अथवा प्रवासाची मुदतवाढ संप संपल्यानंतर वाहतूकीची नियमित सुरुवात झाल्यापासून तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीकरिता देण्यात येते.

Land record : 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा; ते सुद्धा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!