Sale of land : मोठा निर्णय! जमीन खरेदी-विक्रीचे निर्बंध उठवले; बागायती १० गुंठे अन्‌ जिरायत २० गुंठे जमीनीच्या खरेदी-विक्रीला परवानगी..

Sale of land : बागायती आणि जिरायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये १० गुंठे बागायती आणि २० गुंठे म्हणजेच अर्धा एकर जिरायती जमिनीची थेट खरेदी-विक्री करता येणार आहे.

नवीन आदेशाप्रमाणे तेवढ्या क्षेत्राच्या खरेदी-विक्रीकरिता कोणाच्याही स्वतंत्र आणि वेगळ्या परवानगीची गरजच नाही. मात्र, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीकरिता प्रातांधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मात्र घेणे गरजेचे आहे.

Sale of land : महाराष्ट्रातील अकोला व रागयड हे दोन जिल्हे वगळून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, सोलापूर, चंद्रपूर, सिंधुदूर्ग, नाशिक, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), ठाणे, वर्धा, भंडारा, पालघर, रत्नागिरी, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, हिंगोली, लातूर आणि नागपूर या जिल्ह्यांत शेतकऱ्यांबरोबरच अन्य कोणत्याही व्यक्तीला २० गुंठे जिरायती आणि १० गुंठे बागायती जमिनीची थेटपणे खरेदी-विक्री करता येणार आहे. मात्र, हा नवून बदल महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिका क्षेत्र वगळून लागू असणार आहे.

दरम्यान, नोंदणी उप-महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दुय्यम निबंधकांना पत्राद्वारे नवीन बदलाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. अव्वर सचिव सुभाष राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नवीन मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, या विभागीय आयुक्तांसह जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना या बदलाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन बदलाप्रमने खरेदी-विक्रीची कार्यवाही सुरु Sale of land

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडल्यावर प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ मधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपभूत क्षेत्रामध्ये अशंत: सुधारणा करण्यात आलेली असल्यामुळे त्याप्रमाणेच आता १० गुंठे बगायती व २० गुंठे जिरायती जमिनीची थेट खरेदी-विक्री करता येण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

घरकूल, विहीर व शेत रस्त्यासाठी निर्बंध शिथिल

ज्या नागरिकांना घर बांधण्यासाठी गावात स्वत:ची जागा नाही, आणि त्यांना शेतात घर बांधण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत. तर जमिनी असलेल्या अनेकांच्या नातेवाईकांनाही तोच प्रश्न भेडसावत असल्यामुळे अशा लोकांना ५०० चौरस फूट जागेची खरेदी-विक्री सुद्धा करता येणार आहे. तर दुसरीकडे ज्यांना शेती आहे, पण विहिरीकरिता दुसरीकडे जागा पाहिजे, अशा शेतकऱ्यांपुढे सुद्धा अडचणीचा डोंगर उभा आहे. त्यांना २ गुंठे आणि शेत आहे, पण रस्ता नाही अशा शेतकऱ्यांकरिता देखील रस्त्याकरिता काही प्रमाणात जमीनीची खरेदी-विक्री करता येणार आहे. मात्र त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करून त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याची कार्यवाही साधारणत: १५ सप्टेंबरनंतर सुरु होणार आयाची माहिती विश्वसनिय सूत्रांमार्फत मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!