Shetkari Karj Mafi

Shetkari Karj Mafi Eknath Shinde | शिंदे सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार; वाचा सविस्तर

Shetkari Karj Mafi
Shetkari Karj Mafi

Shetkari Karj Mafi Eknath Shinde: परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारने दिलासा दिला आहे. शेतीमध्ये अनेक संकटांना तोंड देऊन पीक पिकवावे लागते. मात्र, निसर्गाच्या पुढे कुणाचेही चालत नाही. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने हाहाकार उडवला.

शेतकरी कष्टाने सुखरूप घरी शेतमाल आणतो. मात्र, शेतकऱ्यांना जेव्हा आपला शेतमाल विकायचा असतो तेव्हा त्याला पुरेसा भाव मिळत नाही. कधी कधी असे होते की त्याचा खर्च देखील निघत नाही. एवढी बिकट परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची होत आहे. Shetkari Karj Mafi News

अशा विविध कारणांमुळे शेतकरी त्रासून पुढील येणाऱ्या हंगामासाठी आशेने उभा राहून शेती कसण्यासाठी कर्ज घेतो. शेतकरी हा कर्ज घेऊन पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पुढील हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा व्याप वाढत चालतो.

शेतकरी कर्ज हे बुडविण्यासाठी घेत नाही परंतु, निसर्गाच्या अवकाळीपणामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. तसेच निसर्गाशी सामना करून सुखरूप शेतीमाल देखील आणला तरी त्याला कवडीमोल दर मिळतो. यामुळे शेतकरी कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरतो. ‘Shetkari Karj Mafi Yojana’

शेतकरी ऐनवेळी जिथून कर्ज मिळो तेथून कर्ज घेतात. बॅंक असो किंवा सावकाराकडून कर्ज.. आणि शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती आल्याने तो हे कर्ज फेडू शकत नाही. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आवश्यक असते.

कर्जमाफीचा निर्णय
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलं असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सावकरी कर्जमाफी देण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी 28 लाख 59 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

shetkari karjmafi yojana राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीतून बाहेर निघला आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts