‘माझ्यासोबत बोल नाहीतर मी आत्महत्या करेन’; One side love करणाऱ्या रोमियोवर गुन्हा दाखल…
काही दिवसांपूर्वी घडलेल्या संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एका तरुणीला एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची घटना उघडीस आली आहे. इतकेच नाही तर माझ्या बरोबर बोल आणि माझ्यावर प्रेम कर नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी सुद्धा या रोमियो दिली. त्यामुळे घाबरून या मुलीने पोलिसात धाव घेत या रोमियो विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी सिडको पोलिसांनी रोमियोवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चैतन्य राजेंद्र बाबू ढोके वय 34 वर्षे रा. इन्कम टॅक्स हेडक्वार्टर संभाजीनगर (औरंगाबाद ) असे या रोमियोचे नाव असून मागील 25 डिसेंबर 2019 पासून चैतन्य एन-8 परिसरामध्ये राहत असलेल्या तरुणीचा पिच्छा करून तिच्यासोबत सतत बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि तिने बोलण्यास नकार दिल्यावर तिला भर रस्त्यात अडवून माझ्याशी बोलच असा तगादा लावत होता. मात्र तरुणीने त्याला भिक घातली नाही. त्यानंतर चैतन्यने तिचा मोबाईल नंबर मिळवून फोन करून प्रपोज केले. वारंवार व्हॉट्सॲप करून सुध्दा त्रास दिला, मात्र त्यांनतर देखील तरुणीने त्यास नकार दिला.
प्रेम कर नाहीतर आत्महत्याच करतो…
दरम्यान, सादर तरुणी रस्त्याने जात असताना चैतन्यने तिच्या हाताला धरून विनयभंग करत तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करतो, अशी धमकीच दिली. अखेर घाबरलेल्या तरुणीने सिडको पोलिस ठाणे गाठून रोमियोविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात एकतर्फी प्रेम करणाऱ्या चैतन्य राजेंद्र बाबू ढोके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे