२ मिनिटात जाणून घ्या Tata च्या सर्व गाड्यांच्या नव्या किंमती, Nexon पासून Punch पर्यंतची पूर्ण Price List..

Tata Cars Price June 2022 : भारतातील सर्वच वाहन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या मे २०२२ महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारी-नुसार टाटा मोटर्स ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Tata Motars (टाटा मोटर्स) ने आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल मे २०२२ महिन्यात केला आहे. मे महिन्यामध्ये टाटा मोटर्सची (Tata Motars) विक्री वाढून तब्बल ४५,३४१ एवढी झाली असून टाटा कंपनीने कार विक्रीबाबत ह्युंदाई मोटर इंडियाला मागे टाकलं आहे. सध्या टाटा मोटर्स (Tata Motars) च्या गाड्यांना बाजारामध्ये चांगली पसंती मिळत आहे.

टाटा मोटर्स (Tata Motars) ही कंपनी भारतामध्ये एकूण ७ वाहनांची विक्री करते. ज्यामध्ये १) टाटा नेक्सॉन (Tata Nexon), २) टाटा पंच (Tata Punch), ३) टाटा टियागो (Tiago), ३) टाटा टिगॉर (Tigor), ५) टाटा सफारी (Safari), ६) टाटा अल्ट्रॉझ (Altroz) आणि ७) टाटा हॅरियर (Harrier) यांचा समावेश होतो. टाटा मोटर्सने (Tata Motars) काही काळापूर्वी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. जर का तुम्ही सुद्धा टाटा मोटर्सची (Tata Motars)ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला टाटा मोटर्सच्या (Tata Motars) सर्व वाहनांच्या किंमती (बेस व्हेरिएंट आणि टॉप व्हेरिएंट बद्दल) माहिती देणार आहोत.

टाटा मोटर्सच्या (Tata Motars) टाटा नेक्सॉन (Tata Nexon), टाटा पंच (Tata Punch )आणि टाटा अल्ट्रॉझ (Tata Altroz) या तीन्ही कार देशातील सर्वात सुरक्षित कार्स-पैकी आघाडीच्या कार आहेत. या तिन्ही कार्सची ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट करण्यात आलेली असून त्यात या तिन्ही कार्सना सुरक्षेच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळेच बाजारात या गाड्यांना चांगली पसंती मिळत आहे. शिवाय मागील दोन वर्षांपासून टाटा कंपनी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग कॅम्पेन सुद्धा राबवत आहे. त्याचा कंपनीच्या अनेक वाहनांना फायदा होत आहे.


विशेष सूचना : या लेखामध्ये दिलेल्या सर्व गाड्यांच्या किंमती या दिल्ली एक्स-शोरूममधील आहेत. शिवाय एक लक्षात घ्या की या यादीमध्ये टाटाच्या सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कार्सच्या किमती दिलेल्या नाहीत.

Similar Posts