सरकार आयकर स्लॅबमध्ये करतेय मोठे बदल..! 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त…!
आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.. जर तुम्हीही भारी आयकर भरून त्रस्त असाल तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही.. यावेळी केंद्र सरकार करात मोठा बदल करण्याचा विचार करत असून,, त्यानंतर 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट देणार आहेत..
आता मर्यादा 2.5 लाख रुपये आहे
तुमच्या माहितीसाठी, सध्या 2.5 लाख रुपयां-पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नसून, सरकार 2.5 लाखाची ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचारात आहे.. म्हणजेच जर का तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही..
2014 शेवटचा बदल मध्ये झाला होता
केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्य-काळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल,, जो अर्थमंत्री सादर करतील.. यानंतर 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत,, त्यामुळे या वर्षी सरकार मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देऊ शकते,, असे मानले जात आहे.. यापूर्वी वैयक्तिक कर सवलतीच्या मर्यादेत शेवटचा बदल हा 2014 साली करण्यात आला होता..