नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुंतवणूकदारांना गिफ्ट; अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ…

Small Savings Scheme: नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुंतवणुकदारांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने एनएससी (NSC),, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी,, आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे..


👉🏻• हे नवे व्याजदर उद्या दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार असून अर्थ मंत्रालयाच्या बैठकीमध्ये ( Finance Ministry) हा निर्णय जाहीर करण्यात आला..

♻️ तसेच आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या (Post Office Deposit Schemes) व्याजदरात केंद्र सरकारने शुक्रवारी वाढ केली.. पीपीएफ PPF व सुकन्या समृद्धी योजनेचा ( Sukanya Samridhi Yojana) व्याजदर पाच टक्के कायम ठेवला आहे. करपात्र उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) NSC,, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Senior Citizen Saving Schemes) आणि (KVP) किसान विकास पत्र यांवरील व्याजदरात १.१ टक्क्यांनी वाढ केली आहे.

पोस्टातील ठेवींवर इतका मिळेल व्याज…
● एक वर्षांच्या ठेवींवर ६.६ %,
● दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८ %,
● ३ वर्षांच्या ठेवींवर ६.९ %,
● तर ५ वर्षांच्या ठेवींवर ७ टक्के व्याज मिळेल.

● मासिक उत्पन्न योजनेच्या व्याजदरात ४० बेसिस पॉइंटने वाढ केली असून, या योजनेचा व्याजदर आता ७.१ % असेल..

● राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर २० बेसिस पॉइंटने वाढवून ७ टक्के करण्यात आला आहे..

अल्पबचत योजनांवरील व्याजदर

हे व्याजदर जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाने व्याजदर जाहीर केले आहेत.. मात्र, त्यात पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. मात्र, इतर छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.. या योजनांमध्ये गुंतवणूक वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!