यापुढे वाहतूक पोलिस विनाकारण वाहन थांबवून तपासणी करु शकणार नाहीत; नवे आदेश जारी..

आता वाहतूक पोलिस नाहक वाहन चालकांना थांबवून तसेच काहीही कारण नसताना गाडीची तपासणी सुद्धा करू शकणार नाही. या संबंधीचे आदेशही जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी वाहतूक शाखेला एक परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकाप्रमाणे, वाहतूक पोलिस विनाकारण वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषत: जिथे तपासणी नाके आहेत. वाहतूक पोलिस केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील व वाहतूक कसी सुरळीत राहिल याकडे लक्ष केंद्रित करतील.

वाहतूक पोलिस एखादे वाहन तेव्हाच थांबवू शकतील, जेव्हा त्याच्या वाहनामुळे वाहतुकीवर परिणाम होत असेल, असे अध्यादेशात नमूद केले आहे.

बऱ्याच वेळा वाहतूक पोलिस केवळ संशयाच्या आधारावर वाहने थांबवतात आणि वाहनाची तपासणी करतात त्यामुळे महामार्गावर वाहनांचा खोळंबा होतो. रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनांची तपासणी बंद करण्याचे आदेशही करण्यात आले असून, केवळ वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्यास बजावण्यात आले आहे. वाहन-चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंड आकारला जाऊ शकतो, असे जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीच्या वेळेस, वाहतूक पोलिस फक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरच कारवाई करतील आणि वाहनांची तपासणी करणार नाहीत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास याला संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षकास जबाबदार समजले जाईल.

तसेच या आदेशामध्ये वाहतूक पोलिसांनी केवळ संशयाच्या आधारावर वाहनांची डिक्की तपासू नयेत, वाहनांना अडवू नये, असे वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जवान या पूर्वीप्रमाणेच वाहतूक गुन्ह्यांवर चालान देईल आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखतील, असे सुद्धा ते म्हणाले.

दरम्यान, पोलीस आयुक्त यांच्याआदेशाची प्रत सह पोलीस आयुक्त (वाहतूक) तसेच वाहतूक विभागाचे अप्पर आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे..

Similar Posts