Union Bank Personal Loan : 15 लाख रुपये कर्ज आणि तेही फक्त 10 मिनिटांत; काय आहे युनियन बँकेची भन्नाट ऑफर? जाणून घ्या
Union Bank Personal Loan : आजच्या काळात प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज भासू शकते. तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असलात, काहीवेळा तुम्हाला अतिरिक्त पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय असू शकतो. युनियन बँकेच्या वैयक्तिक कर्जाबद्दल जाणून घेऊया.
Union Bank Personal Loan ची वैशिष्ट्ये
युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट वैयक्तिक कर्ज सुविधा प्रदान करते. या कर्जाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत:
- कर्जाची रक्कम: तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये कर्ज घेऊ शकता.
- कर्जाचा कालावधी: हे कर्ज 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.
- व्याज दर: बँक 11.31% ते 15.45% पर्यंत व्याजदराने कर्ज देते.
- महिलांसाठी विशेष सुविधा: नोकरदार महिलांना 7 वर्षांपर्यंत कर्जाची मुदत मिळते.
Union Bank Personal Loan साठी कोण अर्ज करू शकतो?
युनियन बँक वैयक्तिक कर्ज दोन प्रकारच्या लोकांना दिले जाते:
- पगारदार कर्मचारी
- स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती
तुम्ही या दोनपैकी कोणत्याही प्रकारात मोडत असाल तर तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता.
Union Bank Personal Loan ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
युनियन बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घरबसल्या आरामात खालील प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सर्व प्रथम युनियन बँकेच्या वेबसाइटवर जा.
- तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा.
- कर्ज विभागात जा आणि ‘वैयक्तिक कर्ज’ चा पर्याय निवडा.
- तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकून तुमची कर्जाची पात्रता तपासा.
- कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करतांना त्यात तुमची सर्व माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
- सर्वकाही तपासल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.