आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना WhatsApp च्या साहाय्याने पॅन-कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. DG Locker सेवेचा वापर करण्याकरिता नागरिक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकणार आहे असे मंत्रालयाने म्हटलं आहे.
लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे डाउनलोड करणे अशा सर्व सुविधा व्हॉट्सॲपवर दिल्या जातील.
WhatsApp वर MyGov हेल्पडेस्कची ही सुविधा हे नागरिकांच्या सोयीसाठी टाकलेले एक मोठे पाऊल आहे. MyGov हेल्पडेस्क आता DG Locker सेवेद्वारे लोकांना घरबसल्या अनेक सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असलेले कोणतेही कागदपत्रे येथून लगेच डाउनलोड करता येईल. यासोबतच लोकांना अडचणीच्या वेळीही या सुविधेचा वापर करता येणार आहे.
या कागदपत्रांचा समावेश-
या अंतर्गत लोक पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट, विमा पॉलिसीची इत्यादी कागदपत्रे ठेवू शकतात.
व्हॉट्सअॅपवरील डिजिलॉकर फिचरचे फायदे-
देशभरातील WhatsApp वापरकर्ते WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर ‘हॅलो किंवा हाय किंवा डिजिलॉकर’ संदेश पाठवून चॅटबॉटचा वापर करू शकतात. यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट डाउनलोड करायचे आहे, ते डिजिलॉकरवरून डाउनलोड करता येऊ शकते. WhatsApp वर DigiLocker सारखे वैशिष्ठ्ये, MyGov चॅट-बॉट हे नागरिकांना संसाधने आणि अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने बनवले आहे.
80 दशलक्षाहून अधिक लोक जोडलेले आहेत
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या काळात, WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क (पूर्वी MyGov Corona हेल्पडेस्क म्हणून ओळखले जाणारे) लोकांना कोरोनाशी संबंधित माहिती देत असे. यासोबतच लसीचे प्रमाणपत्र बुक करून डाऊनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. आतापर्यंत 80 दशलक्षाहून अधिक नागरिक हेल्पडेस्कवर पोहोचले आहेत, 33 दशलक्षाहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत आणि देशभरात लाखो लसीकरण अपॉइंटमेंट बुक केल्या गेल्या आहेत.