आजपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात; सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

IND vs SA 1st ODI : आजपासून इंडिया व साऊथ आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला आफ्रिकेत कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघाने सुरुवात देखील विजयाने केली मात्र कसोटी मालिका 2 : 1 अशा फरकाने गमावली . मात्र , कसोटी मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघाची नजर आता वनडे मालिकेवर आहे.

यजमानांना या फॉरमॅटमध्ये पराभूत करून कसोटीतील भारताला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी क्रिकेटप्रेमीही उत्सुक आहेत.

भारत संघ:

केएल राहुल ( C ), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, दीपक चहर , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक ), इशान किशन ( WK ), यजुवेंद्र चहल, रवचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह ( VC ), व्यंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज ( बॅकअप नवदीप सैनी ).

दक्षिण आफ्रिका संघ :

टेम्बा बावुमा ( C ), केशव महाराज ( VC ), क्विंटन डी कॉक ( WK ), झुबेर हमझा, मार्को जानसेन, जानेमन मलान, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो , ड्वेन प्रिटोरियस , कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रुसी व्हॅन डर ड्युसेन आणि काइल व्हर्न ( WK ).

सामना कधी आणि कुठे पाहता येणार ?

India and South Africa यांच्यातील पहिला वनडे सामना आज (19 जानेवारी) पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळला जाणार असून टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होईल, तर सामन्याला दुपारी 2.00 वाजता सुरुवात होणार आहे.
पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहिले जाईल . तर लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!