स्मार्ट आधार कार्ड नको रे बाबा; आधारबाबत महत्वपूर्ण अपडेट, ‘हे’ कार्ड आता कचऱ्यात! …

भारतात आधार कार्डचे नियमन करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ने आधारकार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट जारी केले आहे. आधारकार्ड प्रिंट करुन प्लास्टिक कार्डच्या ( पीव्हीसी कार्ड ) रुपात बनविण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे अशा प्रकारचे कार्ड बनविण्याऱ्यांना ‘यूआयडीएआय’ ने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आधार धारकांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन होण्याचा यामुळे धोका असल्याचे ‘ यूआयडीएआय’ने म्हटले आहे.

▪️पीव्हीसी आधार कार्ड प्रमाणित सरकारी एजन्सीकडून प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे . त्यामुळे केवळ 50 रुपयांचे शुल्क भरुन ग्राहक आधार कार्ड ऑर्डर करू शकतात. ‘ यूआयडीएआय’ने ट्विटरद्वारे लिंकही जारी केली आहे.

UIDAI ने ट्विटद्वारे महत्वाचा खुलासा केला आहे. पीव्हीसी कार्ड किंवा प्लास्टिक कार्ड तसेच आधार स्मार्ट कार्ड सार्वजनिक खासगी ठिकाणी बनविल्यास वैध ठरणार नाही.

कोणते आधार वैध ?

ट्वीटमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे आधार वैध असतील याविषयी देखील यूआयडीएआयने माहिती दिली आहे. uidai.gov.in वरुन डाउनलोड केलेले आधार, एम-आधार प्रोफाईल किंवा यूआयडीएआयद्वारे जारी करण्यात आलेले आधार प्रमाणित मानले जाईल आणि आधारची आवश्यकता असलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी उपयोगात आणण्यास मान्यता राहील.

‘ते’ स्मार्टकार्ड टाळा..

आधारकार्ड बनविण्यासाठी अर्ज केला जातो. योग्य अर्ज आणि विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आधारच्या वेबसाईटवर कार्ड उपलब्ध होते. वस्तुत: आधारची पीडीएफ उपलब्ध केली जाते. अधिकांश लोक ह्याच पीडीएफचे खासगी झेरॉक्स किंवा लॅमिनेशन सेंटर येथे स्मार्टकार्ड किंवा लॅमिनेशन कार्डमध्ये रुपांतरित करतात. मात्र, दुकानदारांनी बनविलेल्या अशाप्रकारच्या प्लास्टिक कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते. त्यामुळे आधार नंबरसह महत्वाची गोपनीय माहिती लीक होण्याचा सर्वात मोठा धोका असतो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!