औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच; सिडको भागात 36 वेळा चाकूने भोसकून युवकाचा खून..

शनिवारी रात्री पूर्वैमनस्यातून युवकाची तब्बल 36 वेळा चाकूने भोसकून निघृणपणे हत्या केल्याची घटना सिडको परिसरातील मिसरवाडी या भागात उघडकीस आली असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरामधील मिसरवाडी परिसरात राहणाऱ्या हसन साजीद पटेल या पंचवीस वर्षे तरुणाची 9 जणांनी मिळून हत्या केल्याचे केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री समोर आली आहे.

मृत हसन पटेल

मिळालेल्या माहितीनुसार, मिसारवाडीमध्ये राहणाऱ्या हसन पटेल याची 9 जणांनी मिळून हत्या केली असून याप्रकरणी हसनचा भाऊ जावेद पटेल याच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत हसन याचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. तो रात्री 9 वाजता घरातून बाहेर पडला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर मिसारवाडीतील एका टपरीजवळ नासिर अब्दुल पटेल, तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, राहील अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी, अली सुलतान चाऊस या नऊ जणांनी हल्ला चढवला.

यामधील मुख्य आरोपी तालेब चाऊस हा असून त्यानेच हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचे जावेद याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून या संदर्भात अधिक तपास दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!